
'टाटा नॅनो कार'... सर्व सामान्यांच्या स्वप्नातील कार.... इतर गाड्यांच्या किमती हाताबाहेर असताना रतन टाटा यांनी मात्र सर्वसामान्याची स्वप्नपूर्ती करणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी कार बाजारात आणली.

रतन टाटा यांना एका सामान्य कुटुंबाला गाडीवर जाताना पाहूनच ही संकल्पना सुचली होती. नोव्हेंबर 2003 मध्ये रतन टाटा प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी स्कूटरवर जाणाऱ्या एका कुटुंबाला पाहिलं.

कुटुंबातील चारजण एकाच स्कूटरवरून जात होते. जोरदार पाऊस होत होता. तेव्हाच रतन टाटा यांनी ठरवलं की या सामान्य कुटुंबांसाठी काही करायचं. त्यांनी लगेचच तसा प्लॅन तयार केला.

पुढे पाच वर्षांनी टाटा ग्रुपने नॅनो कार लॉन्च केली. ही कार लॉन्च करताना रतन टाटा यांनी ही गोष्ट ऐकवली होती. सर्व सामान्य कुटुंबाच्या खिशाला परवडणारी आणि आरामात प्रवास करू शकतील अशी ही नॅनो कार... यातूनच रतन टाटा यांचं सामाजिक भान लक्षात येतं.

जगातील सर्वात स्वस्त कार... अशी या कारची ओळख झाली. सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी नॅनो कारच्या माध्यमातून साकार केलं.