AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार लोनवर मिळवा घसघशीत टॅक्स डिस्काऊंट; नवी ट्रिक काय?

अनेकांचा अर्धाअधिक पगार घराचा EMI, कारचा EMI किंवा इतर कारणांसाठी घेतलेल्या लोनचे EMI फेडण्यातच जातो. आता यातून तुम्हाला दिलासा मिळण्यासाठी आज आम्ही एक खास माहिती देत आहोत. तुम्ही प्रोफेशनल कारणांसाठी कार वापरत असाल तर तुम्हाला कार लोनवर भरलेल्या व्याजावर टॅक्स डिस्काऊंट मिळू शकतो. आता हे कसं शक्य आहे, यासाठी नेमकं काय करावं लागेल, याविषयीची सविस्तर माहिती खाली अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या.

कार लोनवर मिळवा घसघशीत टॅक्स डिस्काऊंट; नवी ट्रिक काय?
Car LoansImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 1:38 PM
Share

गृहकर्ज, कार लोन, मुलांचे शिक्षण, या खर्चांपासून कुठे तरी उसंत मिळावी, याचा विचार आपण सर्वसामान्य लोक करत असतो. आज आम्ही तुम्हाला दिलासा देणारीच बातमी देणार आहोत. तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही टॅक्स डिस्काऊंट म्हणजेच कर सवलत मिळवू शकतात. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

तुम्हाला माहिती आहे की, कार लोनकडे लक्झरी खर्च म्हणून पाहिलं जातं. यामुळे या लोनसाठी करसवलतीची तरतूद नसते. पण, तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा इतर कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल आणि व्यवसायासाठी आपल्या कारचा वापर करत असाल तर तुम्ही करात सूट मिळवू शकता. आता यासाठी नेमकं काय करावं लागेल, याविषयी खाली अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सांगणार आहोत.

डिस्काऊंट कसं मिळवायचं?

तुम्ही कारचा वापर व्यवसाय किंवा कोणत्याही प्रोफेशनल कारणांसाठी करत असाल तर कार लोनवरील व्याजावर टॅक्स डिस्काऊंट मिळवणं शक्य आहे. आता कर सवलतीत नेमका कशाचा समावेश होतो, हे जाणून घ्या.

कर सवलतीत कशाचा समावेश?

तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीचे मालक असाल किंवा तुमची कार भाड्याने देत असाल तर तुम्हाला कर विवरणपत्रात व्यवसायाची किंमत म्हणून व्याजाची रक्कम दाखवता येईल. तसेच वार्षिक इंधन खर्च आणि देखभाल खर्चाचाही कर सवलतीत समावेश करता येईल. डेप्रिसिएशन कॉस्ट म्हणजेच कारच्या किंमतीत कपात झाल्याचा दावाही डिस्काऊंटसाठी केला जाऊ शकतो. अवमूल्यन खर्च वार्षिक 15 ते 20 टक्क्यांपर्यंत असतो.

उदाहरण पाहा

आता सोप्या भाषेत आणि अगदी सोप्या उदाहरणानं समजून घेऊया. असं गृहित धरा की तुमचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे. आता तुम्ही कार लोनचे व्याज 70 हजार रुपये भरले असेल तर तुमचे टॅक्स कॅलक्युलेशन 9.30 लाख रुपये होईल. इंधन आणि देखभाल खर्चाबरोबरच कर सवलतीही अधिक असू शकतात.

योग्य कागदोपत्री पुरावे असावे

गृहकर्जात थेट कर सवलत दिली जाते. तर कार लोन केवळ व्यावसायिक वापराच्या अटीवर करमुक्त असते. अशा प्रकारे तुम्ही योग्य कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्यास व्यावसायिक कारशी संबंधित खर्चाचे कर लाभांमध्ये रूपांतर करू शकतात.

दंड होऊ शकतो

एक गोष्ट लक्षात घ्या की, कर सवलतीचा दावा करताना कारचा वापर व्यवसायात होत असल्याचा पुरावाही देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खोटा दावा केल्यास प्राप्तिकर अधिकारी तो फेटाळून लावू शकतात आणि दंडही ठोठावू शकतात.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट