500 रुपयांची नियमित बचत करुन श्रीमंत व्हा, गुंतवणुकीचे पाच स्मार्ट मार्ग

| Updated on: Jan 29, 2021 | 3:40 PM

पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीतून धनाढ्य होण्यासाठी पाच सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट प्लॅन जाणून घ्या (Ideas to become crorepati )

500 रुपयांची नियमित बचत करुन श्रीमंत व्हा, गुंतवणुकीचे पाच स्मार्ट मार्ग
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

How to become Crorepati : पैसे कमवून कोट्यधीश होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीनुसार थोडे थोडे पैसे साठवून तुम्हीही श्रीमंत होऊ शकता. पैशांचं योग्य मॅनेजमेंट करा, दिवसरात्र कष्ट करुन कमावलेला तुमच्या तिजोरीतील पैसाच तुम्हाला श्रीमंतीची वाट दाखवेल. केवळ पैशाची बचत करुन श्रीमंत होणं कठीण आहे. बचतीसोबतच योग्य नियोजन केलं, तरच श्रीमंत होण्याची तुमची इच्छा केवळ दिवास्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरेल. (How to make money Ideas to become crorepati post office saving schemes and sukanya samriddhi yojana)

पैशांच्या गुंतवणुकीचे (Money Making Tips) अनेक मार्ग आहेत. केवळ पाचशे रुपयांच्या नियमित गुंतवणुकीतूनही तुम्ही चांगली रक्कम उभी करु शकता. गुंतवणुकीच्या अनेकविध योजना असून (money making ideas) छोट्यात छोट्या रकमेतूनही श्रीमंत होण्याची संधी आहे. तुमचा पैसा सुरक्षित तर राहतोच, मात्र रिटर्न्सही चांगले मिळतात. पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीतून धनाढ्य होण्यासाठी पाच सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयांची गुंतवणूक (Mutual Funds Investment)

म्युच्युअल फंडातून सध्या सर्वात जास्त रिटर्न्स मिळत आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये कोणीही गुंतवणूक करु शकतं. यात तुम्ही अवघ्या पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करु शकता. म्युच्युअल फंडात 10 ते 12 टक्के रिटर्न्स सहज मिळतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. म्युच्युअल फंडात तुम्ही ऑनलाईनही गुंतवणूक करु शकता.

पीपीएफमध्ये रिटर्न्सही, करबचतही (PPF account)

पब्लिक प्रॉविडंट फंड (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. इथे दरमहा पाचशे रुपयांची गुंतवणूक तुम्ही करु शकता. सध्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ व्याज मिळते. पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षात दीड लाखापर्यंत रक्कम जमा करु शकता. पीपीएफ खात्यात गुंतवणुकीचा फायदा म्हणजे तुमचा पैसा इथे पूर्णपणे सुरक्षित राहतो. तुम्हाला आयकरातून सवलत मिळतेच, पण त्यावरील व्याजही टॅक्स फ्री असते.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

मुलींच्या भविष्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. यामध्ये गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहतो. सुकन्या समृद्धी योजनेतही गुंतवणुकीवर करात सवलतीचा लाभ मिळतो. चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते, त्यामुळे रिटर्न्सही अधिक मिळतात. या योजनेत तुम्ही एका वर्षात कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. (How to make money Ideas to become crorepati post office saving schemes and sukanya samriddhi yojana)

राष्ट्रीय बचत पत्र (NSC interest rate 2021)

राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificates) ही एक प्रसिद्ध योजना आहे. ही योजना पोस्ट खात्याकडून चालवली जाते. एनएससीमध्ये गुंतवणुकीचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. हे सर्टिफिकेट तुम्ही 100, 500, 1000 किंवा 5000 रुपयात खरेदी करु शकता. राष्ट्रीय बचत पत्र योजनेचा गुंतवणूक काळ पाच वर्षांचा आहे. सध्या या योजनेतून तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्सच्या 80C अंतर्गत सवलत मिळते.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंट (Post Office Saving Schemes)

कमी गुंतवणुकीत जास्त रिटर्न्स मिळवण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता. यामध्ये तुम्हाला चार टक्के दराने व्याज मिळतं. याशिवाय तुमचा पैसाही सुरक्षित राहतो. पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर ते टॅक्स फ्री असते. इथेही तुम्ही केवळ पाचशे रुपयात खातं उघडू शकता

संबंधित बातम्या :

कर बचतीसाठी इन्वेस्टमेंट प्रूफ भरताय? मग ‘या’ गोष्टींकडे नीट लक्ष द्या!

Fact Check: बेरोजगार तरुणांना मोदी सरकार महिन्याला 3800 रुपये देणार?

(How to make money Ideas to become crorepati post office saving schemes and sukanya samriddhi yojana)