Tax Benefits | कर बचतीसाठी इन्वेस्टमेंट प्रूफ भरताय? मग ‘या’ गोष्टींकडे नीट लक्ष द्या!

कर घोषणेमध्ये, लोकांना सर्व प्रकारच्या गुंतवणूकीचे पुरावे द्यावे लागतात, त्या आधारे कंपनी आपली कर कपात निश्चित करते.

Tax Benefits | कर बचतीसाठी इन्वेस्टमेंट प्रूफ भरताय? मग 'या' गोष्टींकडे नीट लक्ष द्या!
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत गुंतवणूकीचे पुरावे सादर करावे लागतात.
Harshada Bhirvandekar

|

Jan 29, 2021 | 2:38 PM

मुंबई : आपल्या येत्या पगारातून कर कापला जाऊ नये, म्हणून सर्व नोकरदार वर्ग सध्या आपल्या कंपन्यांमध्ये ‘कर घोषणेचे फॉर्म’ अर्थात ‘टॅक्स डिक्लरेशन फॉर्म‘ भरण्यात व्यस्त आहेत. कर घोषणेमध्ये, लोकांना सर्व प्रकारच्या गुंतवणूकीचे पुरावे द्यावे लागतात, त्या आधारे कंपनी आपली कर कपात निश्चित करते (Know about income tax saving proofs for tax benefits).

कर घोषित केलेल्या फॉर्ममधील (टॅक्स डिक्लरेशन फॉर्म) गुंतवणूकीचे हे पुरावे कोणते आहेत, ते का आवश्यक आहेत आणि हा फॉर्म भरताना कोणती खबरदारी घ्यावी, या सगळ्याविषयी माहिती Taxbuddy.comचे संस्थापक सुजित बांगर आणि टॅक्स एक्स्पर्ट राज चावला यांनी दिली आहे.

इन्वेस्टमेंट प्रूफ (गुंतवणूकीचा पुरावा) म्हणजे काय?

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत गुंतवणूकीचे पुरावे (income tax saving proofs)सादर करावे लागतात. आपल्याला ते मुख्यतः जानेवारी महिन्यात भरावे लागतात. गुंतवणूकीच्या पुराव्यात कर बचतीच्या सर्व साधनाची माहिती द्यावी लागते आणि या माहितीसह पुरावे देखील सादर करावे लागतात.

याचा फायदा काय?

गुंतवणूकीचा पुरावा थेट कर वजावटीचा स्रोत अर्थात टीडीएसशी जोडलेला आहे. तुमच्या या पुराव्यांच्या आधारेच टीडीएस वजा केला जातो. गुंतवणूकीच्या पुराव्यांच्या आधारे कमी-जास्त टीडीएस वजा केला जातो. हे आर्थिक वर्षाच्या उर्वरित 3 महिन्यांपर्यंत लागू होते. हे पुरावे न जमा केल्यास आपल्या हाती येणाऱ्या पगारावर परिणाम होतो.

इन्वेस्टमेंट डिक्लरेशन फॉर्म

आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला इन्वेस्टमेंट डिक्लरेशन फॉर्म भरला जातो. कर्मचारी त्यांच्या मालकास इन्वेस्टमेंटचे डिक्लरेशन देतात. डिक्लरेशनच्या वेळी आपल्याला पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला जानेवारीतच हे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

गुंतवणूकीचा पुरावा म्हणून काय सादर कराल?

आयकर कलम 80 सी अंतर्गत केलेल्या कोणत्याही गुंतवणूकीची कागदपत्रे आपण पुरावा म्हणून सादर करू शकतो. कारण 80 C अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीला 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते (Know about income tax saving proofs for tax benefits).

इन्वेस्टमेंट प्रूफची यादी

– जीवन विमा पॉलिसी प्रीमियमची पावती -ULIP प्रीमियमचा पुरावा – इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)मधील गुंतवणूकीचा पुरावा – पीपीएफमधील गुंतवणूकीची पावती – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSS) – गृह कर्जाच्या प्रिन्सिपलची परतफेड – दोन मुलांची ट्यूशन फी – कर बचत मुदत ठेव रक्कम – NPS योगदान – सुकन्या समृद्धी योजनेमधील गुंतवणूक – हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरील सवलत

गुंतवणूकीची घोषणा आणि त्याचे पुरावे

गुंतवणूकीच्या घोषणेमध्ये आपण संभाव्य गुंतवणूकीबद्दल माहिती द्या (income tax saving proofs). नवीन वित्तीय वर्षात कर बचत करण्याच्या उद्देशाने केलेल्या आपल्या योजनेस गुंतवणूकीची घोषणा अर्थात इन्वेस्टमेंट डिक्लरेशन म्हणतात. तर गुंतवणूकीचे हे पुरावे वर्षाभरासाठी कर बचतीची साधने आहेत. गुंतवणूकीची किंवा विम्याची पावती तुम्ही वर्षाच्या गुंतवणूकीचा पुरावा म्हणून देऊ शकता.

कर बचत गुंतवणूक

प्राप्तिकर कलम 80C अंतर्गत काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूकीवर कर माफ करण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस), सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय), युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लान (यूलिप), कर बचत एफडी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यासारख्या योजनांमधील गुंतवणूकीचा समावेश आहे.

आयकर कलम 80 D अंतर्गत तुम्हाला वैद्यकीय खर्चावर कर सवलत मिळू शकते. यात स्वत:चा जोडीदार आणि पालक यांच्या वैद्यकीय खर्चावरील सवलत समाविष्ट आहे. कलम 80 G जी अंतर्गत सेवाभावी संस्थांना दिलेल्या देणग्यांना करात सूट मिळते.

(Know about income tax saving proofs for tax benefits)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें