PPF मध्ये गुंतवणूक करुनही कोट्याधीश होण्याची संधी, ‘या’ आहेत सोप्या टिप्स

पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी त्यांच्या पैशांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा असतो.

PPF मध्ये गुंतवणूक करुनही कोट्याधीश होण्याची संधी, 'या' आहेत सोप्या टिप्स
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:36 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाची नियमितपणे बचत करण्याची पद्धत वेगळी असते. काहीजण एलआयसीच्या माध्यमातून पैसे साठवतात, तर कुणी अन्य पद्धतीने पैशांची बचत करतं. काही लोक भविष्य निर्वाह निधी योजनेचा (पीपीएफ) उपयोग करुन देखील पैशांची बचत करतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी त्यांच्या पैशांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा असतो. म्हणूनच ते कमी रिस्क घेत पीपीएफमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. असं असलं तरी पीपीएफमध्ये गुंतवणूक करुनही कोट्याधीश होता येतं. त्यामुळे तुम्हालाही पीपीएफच्या माध्यमातून बचत करत कोट्याधीश होण्याची इच्छा असेल तर काही महत्त्वाच्या टिप्सचा नक्कीच विचार करता येईल (Important tips for become crorepati by investing in PPF scheme ).

तुम्हाला कोणताही धोका न घेता पीपीएफच्या माध्यमातून परताव्याच्या स्वरुपात 1 कोटी रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला थोडा जास्त काळ गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय तुम्हाला महिन्याच्या शेवटी, त्रैमासिक, सहामाई किंवा वर्षाच्या शेवटी द्यावा लागणाऱ्या हप्त्याची रक्कमही वाढेल. पीपीएफमध्ये इतर ठिकाणांपेक्षा कमी व्याज मिळते. मात्र, या योजनेत अगदी नगण्य धोका असतो. त्यामुळेच कमी व्याजदर असूनही अनेक लोक पीपीएफला प्राधान्य देतात. त्यामुळे तुम्हाला जर या सुरक्षित योजनेतून कोट्याधीश व्हायचं असेल तर अगदी कमी वयातच यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे.

पीपीएफमध्ये किती व्याजदर?

पीपीएफमध्ये आधी चांगलं व्याज मिळत होतं. मात्र, सध्या या योजनेसाठीचं व्याजदर कमी करण्यात आलंय. पीपीएफच्या व्याज दरात नेहमीच बदल होत राहतात. मागील वर्षी पीपीएफचे व्याजदर 7.9 टक्क्यांवरुन 7.1 टक्के करण्यात आले होते. या व्याजदरात आगामी काळात वाढ होऊ शकते असाही अंदाज लावला जात आहे. असं असलं तर इतर अनेक पॉलिसी यापेक्षा अधिक व्याजदर देण्याचा दावा करतात.

पीपीएफमध्ये किती पैसा जमा करु शकतात?

पीपीएफमध्ये पैसे जमा करण्याला काही मर्यादा आहे. याप्रमाणे तुम्ही एका वर्षात 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पीपीएफ खात्यावर जमा करु शकतात. मात्र, एका वर्षात पीपीएफ खात्यावर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा करता येत नाहीत.

कोट्याधीश होण्यासाठी किती वर्षे पैसे जमा करायचे?

जर तुम्हाला पीपीएफच्या माध्यमातून कोट्याधीश व्हायचं असेल तर तुम्हाला 25 वर्षे यात गुंतवणूक करावी लागेल. कारण पीपीएफमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 150000 रुपयेच जमा करता येतात. 25 वर्षांनंतर सध्याच्या व्याजदराप्रमाणे (7.1 टक्के) 1 कोटी 3 लाख रुपये मिळतील.

महत्त्वाची गोष्टी म्हणजे तुम्ही पीपीएफ (PPF) योजनेत तुम्हाला व्याजदराचा पुरेपुर फायदा घ्यायचा असेल तर मासिक, त्रैमासिक, सहामाई किंवा वार्षिक अशा कोणत्याही पद्धतीने हप्ता भरताना तो महिन्याच्या 5 तारखेच्या आधीच भरा. यानंतर हप्ता भरल्यास तुम्हाला व्याजदराचा पूर्ण फायदा मिळणार नाही.

हेही वाचा :

पोस्टाच्या ‘या’ 4 योजनांमध्ये गुंतवणूक करून लखपती व्हा, वाचा किती आहे व्याज

कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा

PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका, ‘हे’ आहे कारण

व्हिडीओ पाहा :

Important tips for become crorepati by investing in PPF scheme

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.