
मुंबई : मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अशा फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक Hyatt Regency तात्पुरतं बंद करत असल्याची मॅनेजमेंटनं घोषणा केली आहे. ही एक अमेरिकन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटॅलिटी चेन असून मुंबईतलं तिचं युनिट बंद करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे एवढं मोठं हॉटेल बंद होण्याची मुंबईतली तरी ही पहिलीच घटना आहे. या युनिटचे इंडियन मालक एशियन हॉटेल वेस्ट(Asian Hotel West) हे तर कर्मचाऱ्यांची पगारही देऊ शकलेले नाहीत. (Hyatt Regency mumbai Suspends operation owner fail to pay Salaries)
गेल्या वर्षभरापासून फक्त मुंबईच नाही तर जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचं संकटं आहे. त्यामुळेच अनेक उद्योगधंदे कायमचे बंद झालेत. काही दिवाळखोरीत निघाले. आश्चर्य म्हणजे ज्यांचं जगभरात नाव आणि साखळी आहे अशाही काही उद्योगांना घरघर लागली. त्यातलच एक म्हणजे अमेरिकन फाईव्ह स्टार हॉटेल हयात रेजेंसी. याच चेनचं मुंबईतलं युनिट बंद केलं गेलं आहे. कोरोना महामारी आणि त्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊननं हॉटेलचं कंबरडं मोडलं आहे. विशेष म्हणजे ज्यादिवशी लॉकडाऊन उठवला गेला त्याच दिवशी हयात रेजेंसी बंद करण्याची घोषणा केली गेली आहे.
मुंबईत टाटा, हिल्टन यांच्यासह अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. त्यापैकीच एक हे हयात रेजेंसी आहे. त्यातही ते अमेरिकन असल्यामुळे बॉलीवुड पार्टीज पासून ते इतर सगळ्या कार्यक्रमासाठी हयात रेजेंसीत रेलचेल असायची. हे हॉटेल मुंबई एअरपोर्टच्या जवळ आहे. याच्याच परिसरात ITC Maratha, Hilton Mumbai International असे इतरही फाईव्ह स्टार हॉटेल आहेत. हयातच्याच आसपास JW Marriott, The Lalit आणि The Leela हेही नावाजलेले आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच राजधानीत एवढं मोठं हॉटेल बंद पडत असेल तर पुढे काय वाढून ठेवलंय हे विचार करण्यासारखं आहे.
हयात रेजेंसी ही जरी अमेरिकन हॉटेल चेन असली तरी मुंबईतल्या युनिटचे मालक इंडियन आहेत. त्यांचं नाव एशियन हॉटेल्स वेस्ट. हॉटेल तात्पुरतं बंद करताना जी नोटीस दिली आहे, त्यात म्हटलं आहे की, Hyatt Regency कडून फंड आलेला नाही. त्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत हॉटेल्सचे सगळे ऑपरेशन्स बंद असतील. विशेष म्हणजे फंड नसल्यामुळे हॉटेलचं मॅनजमेंट नोकरांचा पगारही करु शकलेलं नाही.
(Hyatt Regency mumbai Suspends operation owner fail to pay Salaries)
हे ही वाचा :
रेशनकार्डशिवाय 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत कसे मिळवायचे, जाणून घ्या…
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या