AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशनकार्डशिवाय 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत कसे मिळवायचे, जाणून घ्या…

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी कोरोनाविरूद्धच्या लढाई, दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेले प्रयत्न, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा, कोरोना लसीकरण आणि मोफत धान्य यांसारख्या मुद्द्यांविषयी बोललेत. PM Narendra Modi

रेशनकार्डशिवाय 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत कसे मिळवायचे, जाणून घ्या...
Ration Card
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 11:47 AM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी कोरोना कालावधीत 9 व्यांदा देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाविरुद्धची लढाई, दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेले प्रयत्न, ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा, कोरोना लसीकरण आणि मोफत धान्य यांसारख्या मुद्द्यांविषयी बोललेत. (Learn how to get 5 kg wheat and rice for free without ration card )

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत

देशवासीयांना मोफत रेशन जाहीर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज सरकारने निर्णय घेतला आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे सुरू राहणार आहे. या महामारीच्या काळात गरिबांच्या प्रत्येक गरजा घेऊन सरकार त्यांचे भागीदार म्हणून उभे आहे. म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना दरमहा नि: शुल्क अन्नधान्य निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल.

रेशन कार्ड नसलेल्यांनाही योजनेचा लाभ मिळेल

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांनाही मोफत धान्य मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना फक्त आधार कार्डद्वारे नोंदणी करावी लागेल. यासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर अन्न मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याकडे रेशनकार्ड नसेल तर त्याने आपला आधार घ्यावा आणि त्याला नोंदणी करावी लागेल, त्यानंतर त्यांना एक स्लिप देण्यात येईल. ती स्लिप दाखवल्यानंतर त्यांना मोफत धान्य मिळेल. त्यासाठी राज्य सरकारांचीही जबाबदारी निश्चित केली गेलीय.

गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे मोफत 5 किलो धान्य शिधा कार्डवर उपलब्ध

राज्य शासनाने गरीब कामगारांना मोफत रेशनचा लाभ मिळाला, यासाठी ही योजना सुरू केलीय. गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे मोफत 5 किलो धान्य शिधा कार्डवर उपलब्ध धान्य कोट्याव्यतिरिक्त असेल. म्हणजेच ज्यांना यापूर्वी रेशनकार्डवर धान्य मिळाले आहे, त्यांना 5 किलो अधिक रेशन मिळेल. त्यांना यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यामागील केंद्र सरकारचा हेतू असा आहे की, सर्व गरीब लोक महामारीच्या वेळी उपाशी झोपू नये.

मागील वर्षी छठ पूजेपर्यंत मोफत धान्य देण्यात आले

यापूर्वी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यभागी केंद्रातील मोदी सरकारने दोन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती, आता ती नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, त्यावेळीदेखील पंतप्रधानांनी 80 कोटी देशवासीयांना मोफत रेशन जाहीर केले होते, त्या अंतर्गत छठ पूजेपर्यंत पात्र लोकांना मोफत अन्नधान्य मिळाले.

अन्न योजनेंतर्गत सुमारे 81 कोटी लोकांना मोफत रेशन

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सुमारे 81 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशात सुमारे 23 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनकार्डधारकांना शासनाने अनुदानावर दिलेल्या मोफत धान्य योजनांचा लाभ मिळतो. परंतु यावेळी ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशनही देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

…म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कधी होणार स्वस्त?

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या

Learn how to get 5 kg wheat and rice for free without ration card

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.