‘या’ 3 बँकांमध्ये खाते असेल तर लवकरच ‘अच्छे दिन’ येणार, बंपर नफ्यामुळे ग्राहकांच्या आशा वाढल्या

खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने सुमारे 50% नफा मिळवला. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या बँकेने 460.26 कोटी रुपयांचा नफा कमावला. कर वगळता फेडरल बँकेने मागील तिमाहीत याच कालावधीत 307.62 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. बँकेचे म्हणणे आहे की, सर्व घटक आता चांगले चालले आहेत आणि येत्या काळात बँक आणि त्याच्या ग्राहकांसाठी हे एक चांगले चिन्ह आहे.

'या' 3 बँकांमध्ये खाते असेल तर लवकरच 'अच्छे दिन' येणार, बंपर नफ्यामुळे ग्राहकांच्या आशा वाढल्या
banks
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 11:39 PM

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून बँकांचा नफा सातत्याने वाढत आहे. कोविडदरम्यान लोकांचे उत्पन्न कमी झाले असताना बँकांच्या नफ्यात मोठी वाढ झालीय. याचे मुख्य कारण म्हणजे कोविडमधील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि लोकांना कमाईचे साधन बनवण्यासाठी बँकांनी अनेक योजना चालवल्या, ज्याचा त्यांना फायदा झाला. अलीकडच्या दोन-चार दिवसांत 3 बँका आहेत ज्यांच्या नफ्यात मोठी वाढ नोंदवण्यात आलीय. त्यात आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक आणि येस बँकेची नावे आहेत. बँकांच्या नफ्यात वाढ झाल्याने ग्राहकांना अशी अपेक्षा आहे की कर्ज स्वस्तात आणि कमी EMI वर मिळेल.

तिमाहीत 5,511 कोटी रुपयांचा सर्वाधिक नफा

ICICI बँकेने शनिवारी 2021-22 च्या सप्टेंबर तिमाहीत 5,511 कोटी रुपयांचा सर्वाधिक नफा नोंदवला. या बँकेने वर्षभरापूर्वी 4,251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. परंतु या तिमाहीत हा नफा वाढून 5,511 कोटी रुपये झाला. बँकेच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. अर्थव्यवस्थेला गती येत असल्याने आयसीआयसीआय बँकेच्या भांडवलातही वाढ होताना दिसत आहे.

ICICI बँकेचा नफा किती?

आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे की, 2021-22 च्या जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत एकूण उत्पन्न 26,031 कोटी रुपये झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित तिमाहीत 23,651 कोटी रुपये होते. जर बँकेचा पूर्ण नफा समाविष्ट केला असेल तर या तिमाहीत त्याने आतापर्यंतचा सर्वाधिक 6,092 कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय, जो गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 4,882 कोटी रुपयांच्या तुलनेत होता. बँकेच्या नफ्यात वाढ होण्यामागे एनपीए कमी होणे हे देखील एक कारण आहे. सप्टेंबरमध्ये एनपीए 4.82 टक्के नोंदवले गेले जे एक वर्षापूर्वी 5.17 टक्के होते. निव्वळ NPA प्रथमच 1% वरून 0.99% पर्यंत खाली आला. एका वर्षात बँकेने 25% अधिक व्याज मिळवले, ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

फेडरल बँकेची स्थिती

खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने सुमारे 50% नफा मिळवला. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या बँकेने 460.26 कोटी रुपयांचा नफा कमावला. कर वगळता फेडरल बँकेने मागील तिमाहीत याच कालावधीत 307.62 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. बँकेचे म्हणणे आहे की, सर्व घटक आता चांगले चालले आहेत आणि येत्या काळात बँक आणि त्याच्या ग्राहकांसाठी हे एक चांगले चिन्ह आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (NII) आर्थिक वर्ष 2022 च्या दुसर्‍या तिमाहीत 7 टक्क्यांनी वाढून 1,479.42 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या तिमाहीत 1,379.85 कोटी रुपये होते. 30 सप्टेंबर 2021 ला निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) 3.20 टक्के होते. सोने कर्ज 25.88 टक्क्यांनी वाढून 15,976 कोटी रुपये आणि कृषी कर्ज 20.23 टक्क्यांनी वाढून 17,890 कोटी रुपये झाले. एकूण ठेवी 9.73 टक्क्यांनी वाढून रु. 156,747.39 कोटींवरून रु. 171,994.75 कोटींवर पोहोचल्या.

येस बँकेचे फायदे

खासगी क्षेत्रातील येस बँकेने कर कपात करून 225 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. हा नफा सप्टेंबर तिमाहीसाठी आहे. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत येस बँकेच्या नफ्यात 74% वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत येस बँकेने कर वजा करून 129 कोटी रुपये कमावले होते. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न FY22 मध्ये 23.4% ने घसरून 1,512 कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी निव्वळ व्याज उत्पन्न 1,973 कोटी रुपये होते. शेवटच्या तिमाहीत येस बँकेला निव्वळ व्याज मार्जिन 3.1 टक्के मिळाले, परंतु यावेळी ते 2.2%वर आले आहे. एनपीए गुणोत्तरात घट झाली आणि या तिमाहीत ती 15 टक्के नोंदवली गेली. एक वर्षापूर्वी, एनपीए गुणोत्तर दर सुमारे 17% होता. येस बँकेने डीएचएफएल प्रकरणात 29 कोटी रुपये वसूल केलेत.

संबंधित बातम्या

‘या’ शेजारील देशाची तिजोरी रिकामी, इंधन खरेदीसाठी भारताकडून घेतले 500 दशलक्ष डॉलर कर्ज

कोरोना काळात पेट्रोल अन् डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, पेट्रोल 36 रुपयांनी, डिझेल 27 रुपयांनी महाग

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.