बँकांचे IFSC Code बदलणार !

जाणून घ्या कोणत्या बँकांचे IFSC Code बदलणार (IFSC Code of Banks will be changed)

बँकांचे IFSC Code बदलणार !
नाही करू शकणार ऑनलाइन व्यवहार ? - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएफएससी कोड बदलल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदाने (BOB) एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे.

मुंबई : ऑनलाईन बँकिंग व्यवहार आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. कोणतेही पेमेंट असो, बिल असो, पैसे ट्रान्सफर करायचे असो ऑनलाईक बँकिंगमुळे काही सेकंदात आपल्याला हे शक्य होते. प्रत्येक बँकेचे अॅप मोबाईल आहे, ज्या अॅपमुळे आपल्याला हे व्यवहार करणे सोपे होते. ऑनलाईन बँकिंगसाठी खातेदाराचे नाव, अकाऊंट नंबर यासोबतच महत्वाचे असते ते आयएएफसी कोड(IFSC Code). आयएएफसी म्हणजेच इंडियन फायनान्शिअल सिस्टम कोड. पैसे ट्रान्सफर करताना जर यात चूक झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.(IFSC Code of Banks will be changed)

दोन वर्षापूर्वी देना बँक आणि विजया बँक बडोदा बँकेत विलिन झाली. या निर्णयानंतर देना बँक आणि विजया बँकेचे ग्राहक बडोदा बँकेत समाविष्ट झाले. आता बँक ऑफ बडोदाने एक महत्वपूर्ण बदल केला आहे. देना बँक आणि विजया बँकच्या ग्राहकांना 1 मार्चपासून नविन आयएएफसी कोड(IFSC Code)वापरावे लागणार आहे. बडोदा बँकेने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बँकेच्या माहितीनुसार 28 फेब्रुवारीपासून देना बँक आणि विजया बँकेचे आयएएफसी कोड(IFSC Code)बंद होणार आहेत. जर तुमचे खाते या दोन बँकांमध्ये असेल तर लवकरात लवकर आपण बँकेकडून नविन आयएएफसी कोड(IFSC Code)घ्या. नविन कोड न घेतल्यास 1 मार्चपासून आपण कोणतेही ऑनलाईन व्यवहार करु शकत नाही.

आयएएफसी कोड(IFSC Code) म्हणजे काय?

आयएएफसी म्हणजे 11 अंकांचा एक कोड असतो. रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो. अकरा अंकांच्या या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो. याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. यात पाचवा अंक शून्य असतो. नंतरच्या 6 अंकांवरुन बँक शाखेचा कोड कळतो. बँक ऑफ बडोदाचा आयएएफसी कोड BARB ने सुरु होतो.

आयएएफसी कोड(IFSC Code) प्राप्त कसा कराल?

बँकेकडून सिस्टम इंटीग्रेशन दरम्यान ग्राहकांना पाठवलेल्या मॅसेजमध्ये याबाबत माहिती देण्यात आली होती. 1. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन QR Code स्कॅन करा. 2. कस्टमर केअर हेल्प डेस्क क्रमांक 1800 258 1700 वर संपर्क करा किंवा तुमच्या बँक शाखेत जा. 3. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 8422009988 या क्रमांकावर MIGR <SPACE> जुने खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक एसएमएस करा. या तीन पद्धतीने तुम्हाला नविन आयएएफसी कोड(IFSC Code) मिळेल. 1 मार्चपासून या आयएएफसी कोडनेच तुम्ही बँकिंग व्यवहार करु शकता.

नविन MICR Code चे चेक बुक कसे मिळवाल?

नवीन चेक बुकबाबत बँक ऑफ बडोदाकडून सांगितले की, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत MICR Code कोड वाले चेक बुक 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होतील. तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यामीतूनही चेक बुक मागवू शकता.(IFSC Code of Banks will be changed)

संबंधित बातम्या

‘या’ राज्यातील लोकांच्या खात्यात मोदी सरकारकडून 3 हजार रुपये जमा; कारण काय?

‘या’ सरकारी बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; आता एफडीवर मिळणार जबरदस्त फायदा

SBI रुपे जनधन कार्डासाठी आजच अर्ज करा; मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ

(IFSC Code of Banks will be changed)

Published On - 7:44 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI