SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत करा हे काम, अन्यथा आपले खाते बंद झालेच समजा

| Updated on: Jul 19, 2021 | 4:05 PM

जर तुम्ही हे काम ठरलेल्या मुदतीत केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवेत अडथळा येऊ शकतो. स्टेट बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती दिलीय.

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत करा हे काम, अन्यथा आपले खाते बंद झालेच समजा
SBI Bank
Follow us on

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना नोटीस बजावलीय. बँकेने खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत शक्य तितक्या लवकर पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलेय. बँकेने असे म्हटले आहे की, जर तुम्ही हे काम ठरलेल्या मुदतीत केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवेत अडथळा येऊ शकतो. स्टेट बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती दिलीय.

तर पॅन क्रमांक निष्क्रिय होणार

तसेच बँकेने असे म्हटले आहे की, जर आधार आणि पॅन एकत्र जोडले गेले नाहीत, तर पॅन क्रमांक निष्क्रिय होईल. या कारणास्तव ग्राहकांना त्यांचे खाते सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आधार आणि पॅन लिंक करण्यास सांगितले गेलेय. पॅनकार्ड आधार कार्डसह जोडणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर ठेवली आहे.

अन्यथा एसबीआय बँक खाते निलंबित केले जाणार

30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही केवायसी केले नाही, तर काय होईल? याबाबतही एसबीआयने माहिती दिलीय. केवायसीशिवाय तुमचे बँक खाते निलंबित केले तर तुमच्या खात्यात जमा केलेले पैसे गोठवले जातील. आपण ते पैसे काढू शकणार नाही. तसेच तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अनुदानही मिळणार नाही.
एसबीआयने म्हटले आहे की, जर तुमचे पॅन आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असतील तर तुम्हाला पुन्हा आधार आणि पॅन बँकेत पाठविण्याची गरज नाही. पॅन आणि आधार जोडण्यासाठी सरकारने जुलै 2017 मध्ये प्रथमच अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली.
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये पॅन असणे अनिवार्य आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल, डिमॅट खाते उघडायचे असेल, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा पैशाशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर तुमच्याकडे पॅन असावा.

पॅन आणि आधार जोडण्याची प्रक्रिया

1 आपल्याकडे पॅन आणि आधार कार्ड जोडण्याचे दोन मार्ग आहेत. पहिले एसएमएसद्वारे आणि दुसरे आयकर वेबसाईटवर भेट देऊन करता येईल.
2 जर तुम्हाला एसएमएसद्वारे पॅन आणि आधार जोडायचा असेल तर तुम्हाला यूआयडीपीएन <स्पेस> 12 अंकी आधार क्रमांक <स्पेस> 10 अंकी पॅन क्रमांक 567678 किंवा 56161वर एसएमएस करावा लागेल.

संबंधित बातम्या

कौटुंबिक पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय, नेमकं गणित समजून घ्या…

RD वर सर्वाधिक व्याज देतात ‘या’ बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम

Important Notice for SBI Customers; Do this by September 30, otherwise your account will be closed