RD वर सर्वाधिक व्याज देतात ‘या’ बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 19, 2021 | 3:04 PM

सामान्य नागरिकांनी जमा केलेल्या आरडीवर मिळणारे हे व्याज आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिक व्याज मिळू शकते.

RD वर सर्वाधिक व्याज देतात 'या' बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे. जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे.

मुंबई : फिक्सड डिपॉझिटप्रमाणे रिकरिंग डिपॉजिट RD देखील कमाईचा चांगला उत्पन्न स्त्रोत बनू शकते. RD मिळणारी कमाई ही बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या श्रेणीत गुंतवणूक करता, ती किती वर्षांसाठी असते हे सर्वात महत्त्वाचे असते. बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त व्याज देतात. सध्या बँकेत अनेक प्रकारचे आरडी खाते असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पसंतीने योग्य रक्कम निवडू शकता.

आरडीवरील व्याजदराबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला RD वर 5.50 टक्क्यांपासून 7.55 टक्के व्याज मिळतो. हा व्याज एक वर्षापासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. सामान्य नागरिकांनी जमा केलेल्या आरडीवर मिळणारे हे व्याज आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिक व्याज मिळू शकते.

कोणत्या बँकेत किती व्याज उपलब्ध?

💠एचडीएफसी बँक RD वर सर्वसामान्य लोकांना 6.30 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.80 टक्के दराने व्याज देते.

💠आयसीआयसीआय बँक ही 6.20-6.40 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.70-6.90 टक्के व्याज देत आहे.

💠एसबीआय बँकेतील आरडीमध्ये गुंतवणू केल्यास सर्वसामान्यांना 6.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के व्याज दिला जातो.

💠अलाहाबाद बँक सर्वसाधारण लोकांना आरडीवर 6.25-6.45 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25-6.45टक्के व्याज देत आहे.

💠आंध्रबँकेच्या आरडीवर 6-6.10 टक्के आणि ज्येष्ठांना 6.50-6.60 टक्के व्याज दिला जातो.

💠बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 6-6.25 टक्के व्याज आणि 6.50-6.75 टक्के व्याज दिला जातो.

लहान बँकांमध्ये जास्त व्याजदर

मोठ्या बँकांपेक्षा लहान बँकांमध्ये जास्त व्याज दर जास्त असतो. म्हणजेच उदाहरणार्थ, लक्ष्मीविलास बँक आरडी खात्यावर 7.25-7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.85-8.40 टक्के व्याज देते. तर दुसरीकडे सर्वसामान्य लोकांना पोस्ट ऑफिस आरडीवर 7.20 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना तितकेच व्याज दिले जाते. येस बँक आरडी खात्यावर 7.25-7.50 आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75-8.00 टक्के व्याज देते.

5 वर्षात किती परतावा?

म्हणजे जर समजा तुम्ही आरडी खात्यात दर महिना 5,000 रुपयांप्रमाणे 12 महिन्यासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.5 टक्क्यांनुसार तुम्हाला वर्षभराने 62,311 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला वर्षात 2,311 रुपये व्याज दिले जाईल. पण आरडीमध्ये एका वर्षाच्या गुंतवणूकीमुळे चांगले उत्पन्न मिळत नाही. यासाठी 5 वर्षे उत्तम मानली जातात. जर तुम्ही या रकमेसह पुढील पाच वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 3,54,954 रुपये मिळतील. यात तुम्हाला 54,954 रुपये व्याज मिळेल.

(Recurring deposit interest rates of many bank know about return investment of 5 years)

संबंधित बातम्या : 

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा ‘इतकी’ गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!

20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं

Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI