2.38 कोटी करदात्यांनी आयकर विवरणपत्र भरले, ही आहे शेवटची तारीख

| Updated on: Nov 09, 2021 | 3:09 PM

आयटी विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा आयटीआर ई-फायलिंग पोर्टलवर फाईल करा, जर अद्याप फाईल केला नसेल तर लगेचच करा. सुरुवातीला ही तारीख 31 जुलै 2021 होती, परंतु आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत दाखल करता येणार आहे.

2.38 कोटी करदात्यांनी आयकर विवरणपत्र भरले, ही आहे शेवटची तारीख
Follow us on

नवी दिल्लीः आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी 2.38 कोटींहून अधिक प्राप्तिकर परतावे (ITR) प्राप्त झालेत. इन्कम टॅक्स विभागाने ट्विट करून ही माहिती दिली. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी IT रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. CBDT मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या वैयक्तिक करदात्याने 31 डिसेंबर 2021 ची ITR दाखल करण्याची अंतिम मुदत चुकवली तर त्याला विलंब शुल्क भरावे लागेल आणि उशिरा ITR दाखल करावा लागेल.

जर अद्याप फाईल केला नसेल तर लगेचच करा

आयटी विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा आयटीआर ई-फायलिंग पोर्टलवर फाईल करा, जर अद्याप फाईल केला नसेल तर लगेचच करा. सुरुवातीला ही तारीख 31 जुलै 2021 होती, परंतु आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत दाखल करता येणार आहे. आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, 2.08 कोटींहून अधिक आयटीआरची पडताळणी करण्यात आलीय. 1.68 कोटींपेक्षा जास्त ITR प्रक्रिया केली. त्याच वेळी 64 लाखांहून अधिक परतावा जारी करण्यात आला.

आयटीआर भरताना ही कागदपत्रे सोबत ठेवा

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे ठेवणे महत्त्वाचे आहे. बहुतेक पगारदार करदाते ITR-1 फॉर्म वापरतात. आणि त्यातील बरीचशी माहिती आधीच भरलेली असते. सरकारच्या नव्याने सुरू झालेल्या ई-फायलिंग पोर्टलमध्येही ITR-1 मधील डेटा आधीच भरलेला आहे. लक्षात ठेवा की, नवीन कर फायलिंग पोर्टलला अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे तुम्ही ITR फॉर्ममध्ये आधीच भरलेले तपशील तपासले पाहिजेत. तुमचा ITR भरण्यापूर्वी तुम्ही कोणती कागदपत्रे ठेवावीत हे तुम्हाला सांगणार आहोत.

आयकर पोर्टलवर ही माहिती त्वरित अपडेट करा

नवीन इन्कम टॅक्स पोर्टल लाँच केल्यामुळे काही नवीन नियम देखील बनवले गेलेत, ज्याकडे दुर्लक्ष करून आयटीआर दाखल केला जाणार नाही. वापरकर्ते कितीही तांत्रिक तज्ज्ञ असले तरी त्यांना बदल पहावे लागतील, बदलांनुसार पोर्टलवर अपडेट करावे लागतील, तरच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (आयटीआर फाइलिंग) करता येईल. नवीन आयकर पोर्टलवर, तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती अपडेट करेपर्यंत ITR फायलिंग करू शकत नाही. यामुळेच अनेक लोक अनेक दिवसांपासून नवीन पोर्टलवर कर भरत आहेत, परंतु त्यांचा आयटीआर अजूनही लटकत आहे. नवीन पोर्टलमध्ये बँकेचे तपशील अपडेट केले आहेत की नाही ते एकदा तपासा. नसल्यास बँक खाते अपडेट करा, नंतर आयटीआर फाइल करा, तुमचे काम सहज होईल.



संबंधित बातम्या

आता चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, बँक आधीच खाते पडताळणार, जाणून घ्या

आता पॅकेटवर दोन प्रकारचे दर, MRP सह युनिटची किंमत लिहावी लागणार, 1 एप्रिल 2022 नवा नियम

Income Tax Return 2.38 crore taxpayers have filed income tax returns 31 December 2021 is the last date