Income Tax Rules : टॅक्सचा तो नियम वाचला का? वडिलांनी गिफ्ट म्हणून पैसा दिल्यास कर भरावा लागणार का? मग भावा-बहिणीसाठी नियम काय?

Income Tax Rules for Relatives : मुलगा आणि सूनेला गिफ्ट दिले तर त्यावर कर आकारला जातो, त्याचा नियम काय? भावा-बहिणीला भेट वस्तू दिल्यास कराचा नियम काय सांगतो.

Income Tax Rules : टॅक्सचा तो नियम वाचला का? वडिलांनी गिफ्ट म्हणून पैसा दिल्यास कर भरावा लागणार का? मग भावा-बहिणीसाठी नियम काय?
आयकर
| Updated on: Aug 15, 2025 | 12:38 PM

आयकर खात्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता झटपट कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. इतरही अनेक अपडेट समोर येत आहे. मुलगा आणि सूनेला गिफ्ट दिले तर त्यावर कर आकारला जातो, त्याचा नियम काय? तुम्हाला माहिती आहे का? तर भाऊ आणि बहीण जर एकमेकांना एखादी वस्तू गिफ्ट म्हणून देणार असतील तर त्यावर आयकर नियम लागू होतो का? काय आहे उत्तर, जाणून घ्या.

मुलाला पैसे देण्याविषयीचा नियम काय?

समजा वडीलांनी मुलाला अथवा सूनेला मालमत्ता खरेदीसाठी 20 लाख रुपये दिले तर त्यावर कर लागण्यासंबंधीची कार्यवाही नियमातंर्गत होईल. जर ही रक्कम विना हेतू दिली असेल तर जो ही रक्कम देतो त्याला ‘इनकम फ्रॉम अदर सोर्स’ अंतर्गत ग्राह्य धरली जाईल. जर ही रक्कम संपत्ती, मालमत्ता खरेदीसाठी हस्तांतरीत केली असेल तर आणि मुलगा अथवा सूनेने ही रक्कम मालमत्ता खरेदीसाठी केली असेल तर आयकर खात्याच्या कलम 56(2)(x) अंतर्गत ही रक्कम पूर्णपणे कर मुक्त मानल्या जाते.

केव्हा लागू शकतो कर

जर वडिलांकडून मुलगा अथवा सूनेला केवळ खर्च करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली असेल तर क्लबिंगचा नियम लागू होतो. याचा अर्थ ही रक्कम देणाऱ्याच्या कमाईत ग्राह्य धरण्यात येईल. अनेक लोक कर वाचवण्यासाठी त्यांची रक्कम कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे हस्तांतरीत करतात. अशा प्रकरणात सरकारने आयकर क्लबिंगचा नियम लागू केला आहे. याशिवाय गिफ्ट दिलेल्या पैशातून काही कमाई होत असेल तर त्यावरही आयकर द्यावा लागतो.

भाऊ आणि बहिणीसाठी नियम काय

भाऊ आणि बहिणीतील व्यवहारासाठी काय नियम आहे, याची पण विचारणा होते. तर आयकर कलम 56(2)(x) अंतर्गत भाऊ आणि बहीण हे नाते येते. जर भावाने बहिणीला 20 लाख रुपये गिफ्ट दिले तर त्यावर कोणताही कर लागू होणार नाही. त्याचप्रमाणे बहिणीने भावाला काही रक्कम दिली तर त्यावर कर लावण्यात येणार नाही. जोपर्यंत त्यातून कमाई होत नाही. पण जर त्या रक्कमेतून कमाई होत असले तर देणाऱ्या व्यक्तीच्या कमाईत ही रक्कम जोडण्यात येईल आणि त्यावर कर द्यावा लागेल.

डिस्क्लेमर : ही उपलब्ध स्त्रोतावरून दिलेली माहिती आहे. अशाप्रकारच्या कोणत्याही व्यवहारासाठी कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या