भारत, चीन, अमेरिका …सोन्यासारख्या दिसणार्‍या या धातुच्या मागे का लागली दुनिया? कारण तरी काय

Gold, Silver, Brass, Copper Metal : सर्व जग या सोन्यासारख्या दिसणार्‍या धातुच्या मागे हात धुवून लागले आहे. भारत, चीन, रशियासह अमेरिका या धातुच्या शोधासाठी जमीन पोखरत आहेत. अनेक खाणीत या धातुचा शोध सुरू आहे. कारण तरी काय?

भारत, चीन, अमेरिका ...सोन्यासारख्या दिसणार्‍या या धातुच्या मागे का लागली दुनिया? कारण तरी काय
असं काय आहे या धातुत
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 04, 2025 | 9:23 PM

जागतिक महासत्ता सध्या एका धातुच्या शोधासाठी दिवसरात्र एकत्र करत आहे. या धातुला सोन्यासारखे दिवस आले आहेत. भारत, चीन, रशिया आणि अमेरिकेत तीव्र स्पर्धा सुरू आहे. सोन्यासारखा दिसणारा हा धातु शोधणे ही या देशाची पहिली प्राथमिकता आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. भारत सरकारने पण झाम्बिया या देशात एक खाणीत उत्खनन सुरू केले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत हा धातु आयात करणे राष्ट्रीयत्वालाच धोका असल्याचा अहवाल दिला आहे.

भारताने घेतली आघाडी

27 फेब्रुवारी रोजी भारत सरकारने झाम्बिया देशातील 9,000 चौरस किलोमीटर परिसर अगोदर राखीव केला आहे. तांब्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. तांब्यासाठी सर्वच देशात चढाओढ सुरू आहे. कोबाल्ट आणि तांब्याच्या शोधासाठी भारताचे पण प्रयत्न सुरू आहे. या परिसरात या धातुचे मोठे भांडार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हाईट-हाऊस म्हणाले हा धोका

25 फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसने तांब्याची आयात हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा एक अहवालच प्रकाशित केला आहे. परदेशी तांब्यावर अमेरिकेचे सर्वाधिक अवलंबित्व राष्ट्रीय सुरक्षा, विकास आणि तांत्रिकदृष्ट्या संकटापेक्षा कमी नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका सुद्धा जगभरात तांब्याचा शोध घेत आहे.

ड्रॅगन तर दोन वर्षांपासूनच अलर्ट

चीनने गेल्या दोन वर्षात तांब्याची सर्वाधिक आयात केली आहे. गेल्यावर्षी तर एक वेळ सोन्यापेक्षा तांब्यांच्या किंमतींनी जागतिक व्यापाऱ्यांना संकटात टाकले होते. इतक्या या किंमती वाढल्या होत्या. चीनमध्ये सर्वाधिक मागणी वाढल्याने जागतिक बाजारात तांबे महागले होते. त्याचा परिणाम कमोडिटी मार्केट, वायदे बाजारातही दिसून आला होता.

17 फेब्रुवारी रोजी ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, चीनमधील कंपन्या जगभरात तांब्याच्या खदानी, खाणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कंपन्या कांगो, चिली आणि पेरूमध्ये आघाडीवर आहेत. या देशात सर्वाधिक तांबे आढळून येते. या ठिकाणी तांबे शुद्ध करण्याचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.

तांब्याची इतकी गरज का?

इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि अक्षय ऊर्जेला भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यासाठी तांब्याची अजून मोठी मागणी असेल. 2035 पर्यंत सध्याच्या घडीला खाणीतून जितके तांबे बाहेर काढण्यात येते, त्यापेक्षा कित्येक पटीने हा धातू काढण्यात येईल. या सर्व देशात अक्षय ऊर्जेवर मोठे संशोधन आणि काम सुरू आहे. त्यामुळे तांब्याची अचानक मागणी वाढली आहे.