भारताचा नऊ महिन्यानंतर असा विक्रम, जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला
परकीय चलन साठा वाढला असताना सोन्याच्या साठ्यात १.२३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. त्यानंतर देशाचा सोन्याचा साठा ८४.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. केंद्रीय बँकेने सांगितले की, एसडीआर १५८ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.८३ अब्ज डॉलर्स झाला आहे.

भारताने पुन्हा नवीन उच्चांक निर्माण केला आहे. ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच देशाचा परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला. गेल्या नऊ महिन्यातील हा उच्चांक आहे. चालू वर्षात भारताच्या परकीय चलन साठ्यात ५८.३९ डॉलर अब्जची वाढ झाली आहे. जगातील अनेक देशांकडे इतका एकूण परकीय चलन साठाही नाही. भारत हा सर्वाधिक चलनसाठा असणारा जगातील चौथा असा देश आहे. भारताला ऑल टाइम हायचा विक्रम मोडण्यासाठी अजून २ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.
परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त
सर्वाधिक परकीय चलनसाठ्यात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जपान दुसऱ्या तर स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक आहे. देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. २७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात तो ४.८४ अब्ज डॉलर्सने वाढून ७०२.७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारताचा परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला होता. म्हणजे नऊ महिन्यांत भारताचा परकीय चलनसाठा उच्चांकावर पोहचला आहे.
देशाच्या परकीय चलन साठ्याचा सर्वकालीन उच्चांक मोडण्यासाठी २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधीची गरज आहे. पुढील आठवड्यात हा विक्रम मोडला जाऊ शकतो. सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस परकीय चलन साठा ७०४.८८ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. मागील आठवड्यात परकीय चलन साठा घसरला होता. ही घट १.०१ अब्ज डॉलरने झाली होती. त्यामुळे मागील आठवड्यातील साठा ६९७.९३ अब्ज डॉलरवर होता.
भारताच्या परकीय चलन मालमत्तेतही प्रचंड वाढ झाली आहे. आरबीआयने सांगितले की, २७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्तेची माहिती दिली. त्यानुसार फॉरेन करेंसी असेट्समध्ये ५.७५ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढ झाली आहे. आता ही मालमत्ता ५९४.८२ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे.
सोन्याचा साठा घटला
सोन्याच्या साठ्यात १.२३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. त्यानंतर देशाचा सोन्याचा साठा ८४.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. केंद्रीय बँकेने सांगितले की, एसडीआर १५८ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.८३ अब्ज डॉलर्स झाला आहे. तसेच आयएमएफकडे भारताचा राखीव निधी १७६ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.६२ अब्ज डॉलर्स झाला आहे.