कोविड-19 च्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकणारी भारत एकमेव मोठी अर्थव्यवस्था, हार्वर्डचे विश्लेषण

कोविड - 19 च्या साथीत जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसून त्यातून अनेक बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्थांनी पुनरागमन केले असेल तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचा ग्राफ कोविडआधीच्या सर्व ट्रेंडना मागे टाकणारा आहे.

कोविड-19 च्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकणारी भारत एकमेव मोठी अर्थव्यवस्था, हार्वर्डचे विश्लेषण
indian economy
| Updated on: Nov 22, 2025 | 9:11 PM

कोविड – 19 साथीनंतर वास्तविक जीडीपी वाढीत भारत जगात सर्वोत्तम कामगिरी करणारा देश म्हणून पुढे आला असून त्याने अमेरिका आणि चीनसारख्या पॉवरहाऊसनाही मागे टाकल्याचे हार्वर्डचे प्राध्यापक जेसन फुरमन यांनी म्हटले आहे. हे आर्थिक लवचिकतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फुरमन यांनी शेअर केलेल्या एका प्रभावशाली ग्राफमध्ये 2019 ते 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या वास्तविक जीडीपीला कोविड साथी आधीच्या ट्रेंडच्या तुलना करीत आकडेवारी साजरी केली आहे. हा ग्राफ दाखवतो की बहुतांशी मोठ्या अर्थव्यवस्था 2020 च्या घसरणीच्या प्रदीर्घ प्रभावांशी झुंजत असताना भारताचा ग्राफ 2025 च्या मध्यापर्यंत शून्य रेषा ओलांडून +5 टक्क्यांकडे सातत्याने वाटचाल करत आहे.

फुरमन यांनी जागतिक रिकव्हरीच्या आपल्या विश्लेषणाच्या संदर्भात या चार्टमध्ये पाच प्रमुख अर्थव्यवस्था अमेरिका ( निळा ), युरो क्षेत्र ( हिरवा ) चीन ( राखाडी ), रशिया ( नारंगी ) आणि भारत ( हिरवा – सर्वात वरची जाणारी रेषा ) ची तुलना केली आहे. या सर्व देशांचा जीडीपी 2020 मध्ये नकारात्मक क्षेत्रात घसरलेला होता. युरो क्षेत्र – 25 टक्के, अमेरिका – 5 टक्के आणि चीन-10 टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे.

त्यानंतर रिकव्हरीचे मार्ग संपूर्णपणे वेगळे झाले आहेत. अमेरिकेने वेगाने पुनरागमन केले आणि 2025 पर्यंत +2 टक्क्यांवर तो कायम राहिला, ज्यात अमेरिकेच्या रेस्क्यू प्लान सारख्या आक्रमक वित्तीय प्रोत्साहन योजनांचे मोठे योगदान राहिले आहे. फुरमन यांच्या मते यामुळे अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत स्थायी हानी कमी झाली तरीही भारताची कामगिरी वेगळ्या स्तरावर राहिली आहे.

2020 मध्ये – 5 टक्क्यांच्या खालच्या स्तरावर पोहचल्यानंतर भारताच्या जीडीपीने 2020 पर्यंत साथीच्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकले, साल 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था +3 टक्क्यांपर्यंत पोहचली. आणि साल 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत ती +5 टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था एकमात्र अशी अर्थव्यवस्था आहे ती केवळ वाढलीच नाही तर तिच्या दीर्घकालीन विकास मार्गाच्याही पुढे जात आहे. फुरमन हे यास तात्पुरत्या घटकांपेक्षा संरचनात्मक ताकदीशी जोडतात.

फुरमन यांनी अलिकडे एक्स पोस्टमध्ये म्हटले की भारताची धोरणांनी जागतिक आव्हानातही देशांतर्गत वापर आणि गुंतवणूक वाढवले. तर याच्या विरोधात युरोप ऊर्जा संकट आणि चीन रियल इस्टेट संकट आणि झिरो कोविड धोरणांशी झगडत राहिला आहे. चीनचा आलेख 2025 पर्यंत –5 पर्यंत स्थिर दिसत आहे. तर रशियाचा आलेख निर्बंधामुळे –8 टक्क्यांवर अडकला आहे.

युरो क्षेत्राचा आलेख आताही  –3 टक्क्यांवर आहे. येथे महागाई आणि भू-राजकीय तणाव प्रमुख अडचणी आहेत. अमेरिका देखील मजबूत असूनही मुख्यत: एआ चलित डाटा सेंटर गुंतवणूकीवर अवलंबून आहे. फुरमन यांच्यानुसार 2025 च्या पहिल्या सहामाहीची वृद्धीच्या 92 टक्के वाटा आहे.त्यामुळे याच्या स्थिरतेवर प्रश्न चिन्ह आहेत.

अर्थतज्ज्ञ भारताच्या या वेगाला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक मॉडेल मानत आहेत. आयएमएफच्या मते, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, तरुण लोकसंख्या आणि उत्पादन-आधारित प्रोत्साहनांसारख्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेची वार्षिक 78 टक्के वाढ शक्य झाली आहे. जागतिक मंदी असूनही भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधनिर्माण क्षेत्रातील निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली, तर आयटी सेवा स्थिर राहिल्या.

भारताचे 2027 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य 

खरं तर, भारत सरकारच्या धोरणांमुळे आणि आर्थिक शिस्तीमुळे वित्तीय तूट जीडीपीच्या 6 टक्क्यांपेक्षा कमी राहिलीज्यामुळे पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षेवर योग्य खर्च करता आला. त्यामुळे फुरमन यांचा ग्राफ एका महत्वाच्या बदलावर प्रकाश टाकत आहे. जेथे विकसित अर्थव्यवस्था स्थिरतेशी लढत असताना भारत साल 2027 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू पाहात आहे.

फुरमन यांच्या शब्दात म्हणायचे झाले तर जे त्यांनी अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवरील चर्चेदरम्यान सांगितले ते म्हणतात, बहुतेक देशांमध्ये तीव्र सुधारणा दिसून आल्या, परंतु प्रत्यक्षात फार कमी देश या कोविड मंदीच्या आघातातून पुढे जाऊ शकले. भारत त्या गटाचे नेतृत्व करतो .” जस जसे साल 2025 जवळ येत आहे. तसे या ग्राफचा संदेश स्पष्ट आहे की ताकद केवळ पुनरागमनाबद्दल नाही. ती भविष्याला नव्याने परिभाषित करणे आहे.