AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगात; जपानची E10 ट्रेन येण्यापूर्वीच भारतनिर्मित ट्रेन धावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील नागरी कामे गुजरातमधील भागात वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पाचा पहिला प्राधान्य विभाग 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगात; जपानची E10 ट्रेन येण्यापूर्वीच भारतनिर्मित ट्रेन धावणार
Mumbai Ahmedabad Bullet TrainImage Credit source: Google
| Updated on: Jul 17, 2026 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली, 17 जुलै : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान सरकारांनी एक महत्त्वाचा संयुक्त निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील द्विपक्षीय चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्या असून, नियोजित वेळेपूर्वीच देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

पहिला टप्पा 2027 पर्यंत पूर्ण होणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील नागरी कामे (पिलर आणि ट्रॅक उभारणी) विशेषतः गुजरातमधील भागात वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पाचा पहिला प्राधान्य विभाग 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

जपानची E10 मालिका उशिरा उपलब्ध होणार

जपानने भारतीय हवामान आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक E10 Series बुलेट ट्रेन भारताला देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, या ट्रेन सध्या जपानमध्ये संशोधन आणि विकासाच्या टप्प्यात असून त्यांचा पुरवठा 2030 च्या दशकाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

भारतनिर्मित हाय-स्पीड ट्रेनला हिरवा कंदील

एकीकडे 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर तयार होणार आहे, तर दुसरीकडे जपानच्या E10 ट्रेनसाठी 2030 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होऊ नये आणि शक्य तितक्या लवकर हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू व्हावी, या उद्देशाने भारत आणि जपानने संयुक्त निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार 2027 मध्ये कॉरिडॉर सुरू होताच प्रारंभीची सेवा भारतात विकसित करण्यात आलेल्या हाय-स्पीड ट्रेनद्वारे सुरू केली जाणार आहे. बंगळुरूस्थित BEML (बीईएमएल) कंपनी B28 आणि B35 या सेमी हाय-स्पीड ट्रेनसेटची निर्मिती करत आहे. या ट्रेन ताशी 250 ते 400 किमी वेगाने धावू शकतात. दरम्यान, जपानच्या E10 Series बुलेट ट्रेन ताशी 400 किमीपेक्षा अधिक वेगाने धावण्यास सक्षम असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा