यंदाच्या आर्थिक वर्षात इंडियन कोलच्या उत्पादनात 62 कोटी टनची वाढ होण्याची शक्यता , 67 कोटी टन उत्पादना पर्यंत पोहचणार

यंदाच्या आर्थिक वर्षात इंडियन कोलच्या उत्पादनात 62 कोटी टनची वाढ होण्याची शक्यता , 67 कोटी टन उत्पादना पर्यंत पोहचणार
यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये कोळशाचे उत्पादन 62.2 कोटी टन होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
Image Credit source: TV9

यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन कोलच्या उत्पादनामध्ये 62 कोटी टन उत्पादनाची वाढ होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने या वर्षी 67 कोटी टन उत्पादनाचे टारगेट आखला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 29, 2022 | 8:51 PM

मुंबईः सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेड (coal India limited) ही कंपनी यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये आपले उत्पादन 62 कोटी टनच्यावर उत्पादन बाबतींत टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून कोळसाच्या उत्पादनांमध्ये भयंकर तोटा तसेच घसरण सहन करावी लागली होती. ही बाब कंपनीतील एका अधिकाऱ्यांने सांगितली. या कंपनीचे यंदाचे उत्पादन 28 मार्च पर्यंतचे टर्न ओव्हर 61.44 कोटी इतकं झालं आहे. या उत्पादनामुळे आम्ही गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तोडलेला आहे आणि यंदाच्या रेकॉर्ड जवळ ( Annual record) आम्ही पोहोचलो आहोत.

यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये कोळशाचे (coal income) उत्पादन 62.2 कोटी टन होईल अशी आम्ही आशा व्यक्त करत आहोत, असे कंपनीच्या एका अधिकऱ्याने सांगितले. केंद्राने यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 67 कोटी टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष मनी ठेवले होते.याबद्दल आधीच खणन कंपनीने सुद्धा सांगितले होते. 2019 -20 वर्षात कंपनीचे उत्पादन 60.2 कोटी टन आणि 20-21 59.6 कोटी टन इतके होते.

नॉन कोकिंग कोळशाच्या आयातीत झाली घट

जगभरामध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भारत सरकारने कोळसा आयात करण्याऐवजी आपल्या येथील कोळशाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिलेला आहे. वाढलेल्या किमतीमुळे फेब्रुवारी महिन्यात कोळसा आयात दरांमध्ये 8.76 टक्के ची घसरण पाहायला मिळाली होती. यंदाचे आर्थिक वर्ष आणि गेल्या अकरा महिन्यातील आर्थिक वर्षाबद्दलची जर तुलना करायची झाल्यास यंदाचा कोळसा आयात दर हा 8.76 टक्क्याने घसरला आहे. स्टील मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या कोळशामध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहे परंतु नॉन कोकिंग कोलच्या आयातीमध्ये घसरणच होत आहे.

भारत 85% कोकींग कोल आयात

भारत मोठ्या प्रमाणावर कोळशाची आयात करतो. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वादामुळे कोळशाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती गगनाला भिडाल्या आहेत. स्टील इंडस्ट्रीसाठी कोकींग कोलची आवश्यकता भासते. हा कोकिंग कोल मिळवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. हा कोल आयात करण्यासाठी कार्गो ट्रान्सपोर्ट ची समस्या देखील निर्माण होत आहे. या इंडस्ट्रीच्या सर्व मागण्यांवर सरकार गंभीरतेने विचार करत आहे. कोल बाबतीत होणारा संघर्ष लवकरात लवकर कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे. असे वक्तव्य स्टील मंत्री रामचंद्र प्रसाद यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते. थर्मल कोळशाचा उपयोग वीज संयंत्रामध्ये वीज निर्मितीसाठी प्रामुख्याने केला जातो. कोकिग कोल स्टील मॅन्युफॅक्चरिंग साठी लागणारा प्रमुख कच्चा माल आहे. भारत आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एकंदरीत 85 टक्के कोळसा हा आयात करतो.

संबंधित बातम्या

दोन वर्षानंतर साजरी होणार बाबासाहेब आंबेडकरांची जयंती; 14 एप्रिल रोजी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी;मार्गदर्शक सूचना येत्या चार दिवसात

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, ऊर्जामंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें