..... तर विकासाला ब्रेक निश्चित : रघुराम राजन

नवी दिल्ली: देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2019 नंतर देशात जर कोणतंही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज रघुराम राजन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने देशात स्थिर …

..... तर विकासाला ब्रेक निश्चित : रघुराम राजन

नवी दिल्ली: देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2019 नंतर देशात जर कोणतंही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज रघुराम राजन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने देशात स्थिर आणि मजबूत सरकार हवं, मजबूर सरकार नको असं म्हणत असतात. राजन यांचं विधान मोदींच्या या वक्तव्याच्या जवळ जाणारं आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस (DAVOS) इथं सुरु असलेल्या जागतिक अर्थपरिषदेदरम्यान (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) ते बोलत होते. यावेळी रघुराम राजन यांनी जीएसटी आणि नोटबंदी आणि आरबीआयच्या स्वातंत्र्याबाबतही मत व्यक्त केलं. यावेळी राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांबाबत भाष्य केलं. भारतात उद्योगांना अनुकूल वातावरण गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

राजन म्हणाले, “देशात 2019 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि जर आघाडी किंवा युतीचं सरकार आलं, तर अर्थव्यवस्थेची गती कमी होईल”.

दुसरीकडे काँग्रेस सत्तेत आल्यास राजन यांना अर्थमंत्री करणार असल्याच्या चर्चांवरही राजन यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, मी काही राजकारणी नाही, हे सर्व अंदाज आहेत, जे चुकीचे आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. सत्तास्थापनेसाठी त्यांना कोणत्याही पक्षाची मदत घ्यावी लागली नव्हती. स्थिर सरकार असल्यामुळे निर्णय घेणं हे कोणत्याही सरकारला सोपं जातं. त्याउलट मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन केल्यास, निर्णयप्रक्रियेत विलंब होतो हे सत्य आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांनी आघाडी-युती ऐवजी एकहाती सत्ता असलेलं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कायम राहिल असा अंदाज वर्तवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *