America : या लेकीने उंचावली देशाची मान, अमेरिकेतील सर्वात मोठ्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्ष पदी भारताची कन्या..

| Updated on: Dec 09, 2022 | 4:37 PM

America : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्ष पदी भारतीय महिलेची वर्णी लागली आहे.

America : या लेकीने उंचावली देशाची मान, अमेरिकेतील सर्वात मोठ्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्ष पदी भारताची कन्या..
भारतीय महिलेचा डंका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर भारताचा सातत्याने डंका वाजत आहे. स्पष्ट परराष्ट्र धोरण असो वा कोरोनाला (Corona) साठी भारताने केलेले प्रयत्न असोत, भारताची चर्चा आहे. त्या आणखी एक अभिमानाची गोष्ट जोडल्या गेली आहे. भारतीय वंशाच्या सुष्मिता शुक्ला (Sushmita Shukla) फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्ष (First Vice President) झाल्या आहेत. केंद्रीय बँकेच्या दुसऱ्या सर्वोच्च पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भारताचा अमेरिकेत डंका वाजला आहे.

न्यूयॉर्क येथील केंद्रीय बँकेने याविषयीची माहिती दिली आहे. शुल्का यांच्या नियुक्तीला फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळानेही मंजूरी दिली आहे. शुक्ला यांचा अनुभव पाहता ही नियुक्ती बँकेसाठी महत्वाची आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेच्या (Federal Reserve Bank ) संचालक मंडळाने प्रथमच उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर एखाद्याची नियुक्ती केली आहे. अमेरिकेत सध्या महागाईचा आगडोंब असळला असताना ही नियुक्ती महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. मार्च 2023 पासून शुक्ला या पदाचा जबाबदारी घेतील.

हे सुद्धा वाचा

शुक्ला यांनी या नवीन जबाबदारीबाबत बोलताना त्यांचा आनंद व्यक्त केला. या महत्वपूर्ण संस्थेच्या प्रमुखपदी मिळालेली ही जबाबदारी अनुभवाच्या जोरावर सहज पेलणार असल्याचे त्या म्हटल्या. बँकेच्या विविध गतिशील उपक्रम असेच पुढे नेण्यासाठी अनुभवाचा उपयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय बँकेचे अध्यक्ष आणि सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन विलियम्सने त्यांच्या अनुभवाचा बँकेला फायदा होईल, असे स्पष्ट केले. त्या प्रभावशाली असून त्यांचा माहिती तंत्रज्ञान आणि नाविण्य जोखण्यात चांगला हातखंड असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय बँकेच्या बेवसाईटनुसार, शुक्ला यांच्याकडे विमा क्षेत्रातील दीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्याकडे 20 वर्षांचा मोठा अनुभव असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहेत. त्याचा बँकेला निश्चितच फायदा होणार असल्याचे बँकेचे मत आहे.