भारतीयांना लागलं येड…कसलं ? अहो रशियन दारूचं … 10 महिन्यात उडवला 520 टन लिकरचा धुव्वा

रशियन माध्यमांच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत भारतात रशियन स्पिरिट्सची निर्यात जवळजवळ चौपट वाढली आहे, ज्यामुळे रशियन निर्यातदारांसाठी भारत हाँ एक आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ बनला आहे. काय म्हटलं आहे रिपोर्टमध्ये, जाणून घेऊया सविस्तर..

भारतीयांना लागलं येड...कसलं ? अहो रशियन दारूचं ... 10 महिन्यात उडवला 520 टन लिकरचा धुव्वा
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 26, 2025 | 3:13 PM

भारतात मद्यप्रेमींची काही कमतरता नाही. अनेक देशांमधून प्रसिद्ध वाइन भारतात आयात केल्या जातात आणि त्या खूप लोकप्रियही आहेत. यावेळी, बाजारात भारतीय रशियन वाइन प्रेमींची संख्या जास्त आहे. 2025 या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांततब्बल 520 टन व्हिस्की, जिन, वोडका आणि इतर उत्पादने भारतात आली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जवळजवळ चार पट जास्त आहे,यावरून मद्यप्रेमींची संख्या लक्षात घेऊ शकता. रशियन दारूबाबत कोमता रिपोर्ट समोर आलाय ते जाणून घेऊया.

रशियन मीडियाचा रिपोर्ट

एका मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत भारतात रशियन स्पिरिट्सची निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढली आहे, ज्यामुळे भारत रशियन निर्यातदारांसाठी एक आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ बनला आहे. व्होडका आणि इतर कडक अल्कोहोलिक पेयांच्या रशियन निर्यातदारांसाठी भारत एक आकर्षक बाजारपेठ म्हणून उदयास येत असल्याचे आघाडीचे आर्थिक आणि व्यावसायिक दैनिक वृत्तपत्र वेदोमोस्तीने रशियन कृषी मंत्रालयाच्या फेडरल ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट डेव्हलपमेंट सेंटर (अ‍ॅग्रोएक्सपोर्ट) मधील डेटाचा हवाला देत म्हटले आहे.

या रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं की 2025 च्या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यात, रशियन स्पिरिट उत्पादकांनी भारतात सुमारे 520 टन स्पिरिट्स (व्होडका, जिन, व्हिस्की आणि लिकरसह) निर्यात केले, ज्याची किंमत 9,00,000 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे वजनाच्या बाबतीत तीन पट जास्त आणि आर्थिक बाबतीत चौपट जास्त होतं. व्होडका हा निर्यातीचा मुख्य चालक होता असा दााव ॲग्रोएक्सपोर्टने केला. आर्थिक दृष्टीने पाहिलं तर, या 10 महिन्यांत त्यांची निर्यात अंदाजे 7,60,000 अमेरिकन डॉलर्स इतकी होती.

रशियन लीकरमध्ये भारताचा हिस्सा

मात्र, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रशियन वाइनच्या सर्वात मोठ्या आयातदारांमध्ये भारत हाँ\ 14 व्या क्रमांकावर होता, यातील टनांच्या बाबातीत भारताचा वाटा 1.3 टक्के आणि महसुलाच्या बाबतीत 1.4 – 1.5 टक्के होता, तरीही रशियाचा निर्यातीचा सर्वाधिक वाढीचा दर होता. भारताशिवाय रशियन वाईनच्या इतर प्रमुख आयातदारांमध्ये कझाकस्तान, जॉर्जिया, चीन, अझरबैजान, आर्मेनिया आणि बेलारूस या देशांचाही समावेश आहे.