झोपेतही मुनीर यांना दगाफटका होण्याची भिती, झोपतानाही बुलेटप्रुफ जॅकेट घालतात पाकचे सैन्य प्रमुख
पाकिस्तानात अमर्याद अधिकार मिळाल्यानंतर सर्वोच्च शक्तीशाली झालेल्या आसिम मुनीर यांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. मुनीर यांना त्यांची जियाउल हक सारखी अवस्था होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

पाकिस्तानात हुकूमशाह बनलेले सैन्य प्रमुख आसिम मुनीर सातत्याने भीतीच्या छायेखाली जगत आहे. ते एवढे घाबरले आहेत की घरातही नेहमी भरलेली पिस्तुल आणि रायफल ठेवत आहे. एवढेच नाही तर कोणात्याही संकटापासून वाचण्यासाठी मुनीर वर्दीच्या खाली बुलेटप्रुफ जॅकेटचा वापर करत आहेत. असे म्हटले जाते की मुनीर झोपतानाही बुलेटप्रुफ जॅकेट घालूनच झोपत आहेत.
झोपताना मुनीर त्यांच्या घराच्या गेटवर सुरक्षा गार्डना तैनात करतात. ज्यामुळे कोणी आत येऊ हल्ला करु शकेल. पाकिस्तानात शक्ती मिळाल्यानंतर मुनीर यांना आता जिया उल हक यांच्या सारखी त्यांची गत होण्याची भीती सतावत आहे. साल १९८८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालिक सैन्य हुकूमशाह जियाउल हक यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. पाकिस्तानने यास तांत्रिक बिघाडाने झालेला अपघात म्हटले होते, परंतू हा तांत्रिक बिघाड जाणीव पूर्वक केलेला होता.
ट्रेनिंग ऑफिसरवर विश्वास नाही
मुनीर यांनी त्यांच्या सुरक्षेतून ट्रेनिंग ऑफिसरना हटवले आहे. मुनीर यांना प्रशिक्षणार्थी ऑफीसर्सवर विश्वास नाही. इमरान खान यांचे माजी सल्लागार शहशाद अकबर यांच्या मते आसिम मुनीर यांच्या सुरक्षेत जुने आणि इमानदार जवान तैनात केले आहेत. तो व्यक्ती सर्वात जास्त घाबरलेला आहे. ज्याने स्वस्त: कायदा बदलून स्वत:ला सर्वाधिक ताकद बहाल केली अशी टीका शहशाद अकबर यांनी केली आहे.
पीटीआय पक्षाच्या या नेत्याच्या मते मुनीर यांना सर्वाधिक भीती ओव्हरसीज पाकिस्तानी यांच्या आवाजाची आहे.मुनीर पाकिस्तानच्या कराच्या पैशाचा वापर करुन परदेशात स्वस्त:साठी लॉबिंग करत आहे. शहजाद अन्वर यांच्या या दाव्यांना पाकिस्तानचे पत्रकार मोईद पीरजादा यांनी देखील योग्य ठरवले आहे. पीरजादा यांनी सांगितले की मुनीर नेहमी स्वत:जवळ गोळ्यांनी भरलेले पिस्तुल बाळगत आहेत.
कशी आहे आसिम मुनीर यांची सुरक्षा ?
सैन्य प्रमुख म्हणून आसिम मुनीर यांना पाकिस्तानात व्हीआयपी सुरक्षा मिळते. त्या अंतर्गत मुनीर यांची सुरक्षा व्यवस्था चार पदरी आहे. पहिल्या लेयरमध्ये स्पेशल सिक्युरिटी डिव्हीजनचे जवान तैनात राहतात. पाकिस्तानच्या या युनिटमध्ये 15 हजार जवान आहेत. मात्र, मुनीर यांच्या सुरक्षेसाठी या युनिटचे नेमके किती जवान तैनात आहेत याची कोणतीही माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही.
पाकिस्तानच्या संसदेने आसिम मुनीर यांना या वेळी फिल्ड मार्शलची पदवी दिली आहे. याशिवाय मुनीर यांना तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बनवले आहे. मुनीर यांना आण्विक शस्रास्रांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देखील देण्यात आला आहे.
