Smriti Mandhana: कपिल शर्मा शोमध्ये स्मृती मंधानाची दांडी, नेमकं काय घडलं की…
वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या प्रोमोत कुठेच स्मृती मंधाना दिसत नाही. नेमकं असं काय घडलं की तिने या कार्यक्रमाला दांडी मारली.

भारत आणि श्रीलंका महिला संघात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत स्मृती मंधाना खेळत आहे. वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाल्यानंतर स्मृती पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. मात्र असं असताना तिने कपिल शर्माच्या कार्यक्रमाला दांडी मारली. नेटफ्लिक्सने या कार्यक्रमाचा एक ट्रेलर रिलीज केला आहे. यात भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वात खेळाडू दिसत आहेत. पण स्मृती मंधाना यात कुठेच दिसत नाही. ट्रेलरमध्ये हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ति शर्मा, रेणुका सिंह, हरलीन देओल, राधा यादव आणि प्रतिका रावल दिसत आहे. तसेच त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदारही आहेत. ट्रेलरमध्ये सर्व खेळाडू कपिल शर्मा आणि हास्य कलाकार कृष्णा अभिषेक आणि किकू शारदासह हास्यविनोद करताना दिसत आहेत. पण क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला आहे की, स्मृती मंधानाने या कार्यक्रमात भाग का घेतला नाही?
स्मृती मंधान आणि पलाश मुच्छल यांचा विवाह मोडल्यानंतर स्मृती मंधाना सार्वजनिक ठिकाणी जास्त वावरत नाही. लग्न मोडल्याची बातमीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. त्यानंतर एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिथेही क्रिकेट व्यतिरिक्त ती फार काही बोलली नाही. याच कारणामुळे तिने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली नाही अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहे. कपिलने कर्णधार हरमनप्रीतला विचारले की तिने ट्रॉफी उचलण्यापूर्वी भांगडा का केला, ज्यावर तिने उत्तर दिले की स्मृती मानधनाने तिला चिथावणी दिली होती. जेमिमा हसली आणि म्हणाली, “हॅरी दीदी माझे ऐकत नाही, पण स्मृतीने सांगितले की जर मी भांगडा केला नाही तर मी आयुष्यभर तिच्याशी बोलणार नाही.”
INDIA WOMEN’S TEAM AT THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW. ♥️🇮🇳
— Tanuj (@ImTanujSingh) December 25, 2025
स्मृती मंधानाने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आता तिचं पुढचं लक्ष्य आरसीबीला आणखी एक वुमन्स प्रीमियर लीग जेतेपद मिळवून देण्याचं आहे. स्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीने एकदा जेतेपद मिळवलं आहे. दुसरीकडे, पुढच्या वर्षी होणारा टी20 वर्ल्डकपही तिच्या यादीत असणार आहे. सध्या स्मृती मंधाना श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत खेळत आहे. दोन्ही सामन्यात स्मृती काही खास करू शकली नाही. तिने पहिल्या सामन्यात 25, तर दुसऱ्या सामन्यात 14 धावा केल्या. मागच्या पाच डावात स्मृतीने अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केलेल्या नाहीत.
