फक्त 2400 रूपयांमध्ये विमानप्रवासाची संधी, Indigo ने आणली खास ऑफर, वाचा…

Indigo Offer: इंडिगो एअरलाइन्सने फ्लाइंग कनेक्शन्स सेल नावाची एक खास ऑफर आणली आहे. ही ऑफर 13 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या काळातील प्रवासाचे तिकीट बुक करू शकता.

फक्त 2400 रूपयांमध्ये विमानप्रवासाची संधी, Indigo ने आणली खास ऑफर, वाचा...
Indigo
| Updated on: Oct 13, 2025 | 5:23 PM

इंडिगो एअरलाइन्सने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने फ्लाइंग कनेक्शन्स सेल नावाची एक खास ऑफर आणली आहे. ही ऑफर 13 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या काळातील प्रवासाचे तिकीट बुक करू शकता. विशेष म्हणजे या ऑफरमध्ये देशांतर्गत विमानांचे तिकीट फक्त 2390 रूपयांपासून सुरू होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे 8990 रूपयांपासून सुरु होत आहेत. या ऑफरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

8000 पेक्षा जास्त मार्गांवर प्रवास करता येणार

समोर आलेल्या माहितीनुसार इंडिगोच्या या ऑफरमध्ये 8000 पेक्षा जास्त मार्गांचा समावेश केला आहे. हे मार्ग देशभरातील 90 आणि परदेशातील 40 शहरांना जोडतात. त्यामुळे तुम्ही कमी दरात लहान शहरांपासून प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांपर्यंत प्रवास करु शकता. कोची ते शिवमोगा या प्रवासाचे भाडे फक्त 2390 रूपये आहे. तसेच लखनौ ते रांची आणि पटना ते रायपूरचे तिकिट 3590 रूपये आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासावर खास ऑफर

इंडिगोच्या या ऑफरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही फायदा होणार आहे. कोची ते सिंगापूर विमानाचे तिकीट 8990 रूपयांपासून सुरू होत आहे. तसेच अहमदाबाद ते सिंगापूर हे भाडे 9990 रुपये, आणि जयपूर ते सिंगापूर पर्यंतचे भाडे 10190 रूपये असणार आहे. तसेच लखनौ ते हनोई पर्यंतचे तिकीट 10990 रूपये, जयपूर ते हनोई पर्यंतचे तिकीट 11390 रूपये असणार आहे.

अटी आणि शर्ती

इंडिगोची ही ऑफर इंडिगो-ऑपरेटेड फ्लाइट्ससाठी लागू असणार नाही. या ऑफरमध्ये सिंगल आणि राऊड ट्रीपचेही बुकिंग करता येणार आहे. मात्र या ऑफरमध्ये मर्यादित तिकिटे उपलब्ध असणार आहेत. तसेच या ऑफरचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना इंडिगोच्या इतर कोणत्याही सवलतींचा लाभ मिळणार नाही. तसेच तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही. तसेच ही ऑफर ग्रुप बुकिंगवर लागू नाही. प्रवाशांनी व्हिसा, हेल्थ आणि सरकारी नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे, अन्यथा त्यांना बोर्डिंग नाकारले जाऊ शकते असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.