AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराचं बजेट सांभाळा! देशात महागाईचा भडका उडणार, EMI आणखी वाढणार, कारण?

देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गृह, वाहन कर्जावरील EMI आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घराचं बजेट सांभाळा! देशात महागाईचा भडका उडणार, EMI आणखी वाढणार, कारण?
inflationImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 8:59 AM
Share

आगामी काही महिन्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. सिस्टेमॅटिक्स इन्स्टीट्युशनल इक्विटीजच्या रिपोर्टनुसार, भारतात महागाईचा दर पुढील तिमाहीत 6-7 टक्के पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी  रेपो रेटच्या दरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या रेपो रेट हा 5.50 टक्के इतका आहे. तो वाढवून 6.5-7 टक्के होण्याची शक्यता आहे. परंतु आरबीआयने यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही.

शेतकऱ्यांनाही महागाईचा फटका 

रिपोर्टनुसार, कच्च्या तेलाच्या किंमती, हवामानात बदल, एल निनोमुळे महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांचा उत्पादन खर्च देखील वाढू लागला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत नॉन-फायनान्स कंपन्यांना लागणार्‍या कच्च्या मालाच्या खर्चात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत देखील 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांवर होणार आहे. रिपोर्टनुसार, आरबीआयच्या घरगुती चलनवाढ अपेक्षा सर्व्हेक्षणाचा हवाला देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात कुटुंबाची सरासरी चलनवाढीची अपेक्षा ही 9.1 टक्के होती. त्यामुळे लोकांना भविष्यात आणखी भाववाढीची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, अन्न, वीज, खतांवरील सरकारी अनुदान हे मर्यादित ठेवण्यात आलं आहे. सरकारी अनुदान कमी झाल्यास किंमती वाढण्याची शक्यता आहे.

तुमचा ईएमआय वाढण्याची शक्यता, शेअर बाजारावरही परिणाम दिसणार 

रिपोर्टनुसार, आरबीआयने (RBI) आधीच रेपो रेट 25 बेसिस पॉइंटने वाढवून 5.50 टक्के इतका केला आहे. सिस्टेमॅटिक्सच्या नुसार, वाढती महागाई पाहता रेपो रेट हा 100-150 बेसिस पॉइंटने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेच्या व्याज दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने गृह कर्ज, वाहन कर्जाचा ईएमआय वाढणयाची शक्यता आहे. परंतु ही बाब प्रत्येक बँकेच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. महागाई वाढल्याने व्याज दरातही वाढ होईल. याचा परिणाम थेट शेअर बाजारावर पाहायला मिळेल. या महागाईची झळ थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. दुसरीकडे रिपोर्टच्या वेळी 7.24 टक्के असलेला 10 वर्षीय सरकारी रोख्यावर परतावा जर महागाई अपेक्षापेक्षा जास्त राहिली तर 7.5 टक्क्यांवर जाऊ शकतो.

किरकोळ महागाईचा दर वाढणार 

किरकोळ महागाई दर ४.८३% वरून ५.५४% वर पोहोचण्याची शक्यता आहे.  भाजीपाला आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत वाढ होऊ शकते. यामुळे महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४% उद्दिष्टापेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.   वर्षभरात सरकारच्या देखरेखीखालील ४२ जीवनावश्यक वस्तूंपैकी ४१ वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.  केवळ बटाटा स्वस्त झाला आहे. तर  कांद्याच्या दरात तब्बल ११३%, साखरेत २२% आणि सूर्यफूल तेलात १८% वाढ झाली आहे.  तूरडाळीचा सरासरी दर १२९ रुपये किलो, तर चणाडाळीचा दर ९१ रुपये किलोवर पोहोचला आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान