महागाई दराने साडेपाच वर्षांतला उच्चांक गाठला

| Updated on: Jan 14, 2020 | 12:35 PM

महागाई दर यंदा 7.35 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकडेवारीवरुन समोर आली आहे.

महागाई दराने साडेपाच वर्षांतला उच्चांक गाठला
Follow us on

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस चांगलाच हवालदिल झाला आहे. दूध, डाळी, भाज्या यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू महागल्यामुळे जनतेचा संताप होत आहे. त्यातच महागाई दराने गेल्या साडेपाच वर्षांतला उच्चांक गाठल्याची माहिती समोर (Inflation Rate Max in Five Years) आली आहे.

महागाई दर यंदा 7.35 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकडेवारीवरुन समोर आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्याच्या दोन महिन्यांनंतर म्हणजेच जुलै 2014 मध्येही देशातील महागाई दर साधारण इतकाच (7.39 टक्के) होता.

किरकोळ महागाई दराने साडेपाच वर्षातील उच्चांक गाठला आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांवर गेला. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. डिसेंबरचा मूळ महागाई दर 3.7 टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.54 टक्के होता. डिसेंबर महिन्यात कांद्याचा दरही दीडशे रुपयांवर गेला होता, तर डिसेंबर 2018 मध्ये तो 2.11 टक्के इतका कमीही राहिला होता.

रिझर्व्ह बँक येत्या 6 फेब्रुवारी रोजी पतधोरण जाहीर करणार आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महागाई दर आणखी वाढण्याची भीती वर्तवली (Inflation Rate Max in Five Years) जात आहे.