
Elitecon Multibagger stock : अमेरिकेशी तणाव, पाकिस्तानशी संघर्षामुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढउताराची स्थिती आहे. पण अशा वातावरणातही काही शेअर तुफान घोडदौड करत आहेत. मल्टिबॅगर स्टॉक एलिटकॉन इंटरनॅशनलने कमाल केली आहे. गेल्या आठवड्यातही ही कमाल कामगिरी आणि धमाल उडवून दिल्यानंतर मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी इंट्राडे सत्रात हा शेअर 5 टक्क्यांनी वधारला आणि त्याला अप्पर सर्किट लागले. हा शेअर 204.85 रुपयांवर पोहचला. या शेअरने वर्षभरात 7 हजारांची लांब उडी मारली. हा लंबी रेस का घोडा किती जणांचा नशीब पालटणार हे लवकरच समोर येईल.
कंपनीचे उत्पादन काय?
ही कंपनी स्थानिक आणि जागति बाजारात सिगारटे, स्मोकिंग मिक्सर आणि इतर तंबाखू संबंधित उत्पादन आणि व्यापार करते. सध्या या कंपनीचा व्यापार हा संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, हाँगकाँग आणि ब्रिटेनसह इतर युरोपियन देशांसोबत होत आहे. ही कंपनी चघळण्याजोगी तंबाखू, काडेपेटी,पाईप आणि इतर उद्योगातही नशीब आजमावत आहे.
एका वर्षात 7000 टक्के उसळला शेअर
सप्टेंबर महिन्यात या शेअरला प्रॉफिट बुकिंगचा मोठा फटका बसला. त्यात कंपनीचे नुकसान झाले. तरीही शेअर काही मागे हटला नाही. या स्टॉकमधील तेजीचे सत्र कायम आहे. हा शेअर भारतीय स्टॉक बाजारात सर्वाधिक पैसा कमावून देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत आला आहे. सप्टेंबरसह गेल्या 9 महिन्यात हा शेअर 10.16 रुपयांहून थेट 204.85 रुपयांच्या किंमतींवर पोहचला आहे. या काळात यामध्ये 2000 टक्क्यांची वाढ दिसली. तर एका वर्षाचा विचार करता हा शेअर 7,295 टक्क्यांनी तर गेल्या पाच वर्षात हा शेअर 19000 टक्क्यांनी वधारला.
FMCG क्षेत्रात विस्तार
ही कंपनी तंबाखू उत्पादनासह आता पॅकेज्ड फूड्स, खाद्य तेल आणि पेय पदार्थांसारख्या FMCG श्रेणीत सक्रीय झाली आहे. या क्षेत्रात ती विस्तार करत आहे. सोबत तांदळासह डाळी आणि बेदाना आणि इतर सुक्या मेव्यातही या कंपनीने व्यवसायाला सुरुवात केली आहे. या कंपनीच्या संचालकांनी बाजारातून 300 कोटी रुपये उभे करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कंपनीचा पसारा अधिक वाढणार आहे. तर शेअरही मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.