AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund : वाहत्या गंगेत घ्या धुवून हात! व्हा झटपट श्रीमंत, या म्युच्युअल फंड्सची ती व्हायरल गोष्ट

भारताचा सेमीकंडक्टर उद्योग नवीन आहे. पण तो नेटानं पुढे जात आहे. अनेक बड्या परदेशी भारतीय कंपन्या चीप फॅक्टरी आणि असम्बेली युनिट्समध्ये पैसा ओतत आहेत. त्यांना भारतात हा उद्योग मोठी झेप घेईल असे वाटत आहे. त्यात या मुच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांचाही फायदा होणार आहे.

Mutual Fund : वाहत्या गंगेत घ्या धुवून हात! व्हा झटपट श्रीमंत, या म्युच्युअल फंड्सची ती व्हायरल गोष्ट
सेमीकंडक्टर
| Updated on: Sep 21, 2025 | 3:11 PM
Share

Semiconductor Mutual Funds : आधुनिक जगाचा सेमीकंडक्टर आणि चीप हा पासवर्ड ठरणार आहे. लॅपटॉपपासून ते अत्याधुनिक कारपर्यंत अनेक इंडस्ट्रीत सेमीकंडक्टरची मोठी मागणी आहे. देशात सेमीकंडक्टर उत्पादनाला सुरुवात होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. हायटेक चीप बाजारात दाखल होत आहे. भारत आता केवळ चीप खरेदीदार नसेल तर प्रमुख निर्यातदार असेल. सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातंर्गत मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे AI, इलेक्ट्रिक वाहनं, 5जी आणि स्मार्ट डिव्हाईस सारख्या क्षेत्रात चीपची मागणी वाढणार आहे. गुंतवणूकदारांसाठी पण सेमीकंडक्टर एक नवीन सोनेरी दालन ठरणार आहे. या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्यांना कमाईची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

भारताचे सेमीकंडक्टर इकोसिस्टिम

भारताचे सेमीकंडक्टर इकोसिस्टिम वेगाने पुढे जात आहे. IIT मद्रास आणि इस्त्रो मिळून अंतराळ मोहिमेसाठी रिस्क-व्ही कंट्रोलर चिप ‘IRIS’ तयार केली आहे. 2023 मध्ये भारताचा सेमीकंडक्टर बाजार 38 अब्ज डॉलरचा होता. तर वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत तो 45-50 अब्जावर तर वर्ष 2030 पर्यंत हा बाजार 100-110 अब्ज डॉलरचा असेल.

या म्युच्युअल फंडवर ठेवा लक्ष

  • मोतीलाला ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड (Motilal Oswal Flexi Cap Fund) ही डायव्हर्सिफाईड स्कीम आहे. एप्रिल 2014 मध्ये हा फंड बाजारात आला. या फंडचा AUM (असेट्स अंडर मॅनेजमेंट) 136.8 अब्ज रुपये आहे. गेल्या पाच वर्षात या फंडने 29 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या फंडचे सेमीकंडक्टर स्टॉक्समध्ये 17.52 टक्के गुंतवणूक आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक डिक्सन टेक्नोलॉजीज (9.76%), सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सॉल्यूशन्स (6.34%) आणि केन्स टेक्नोलॉजी (1.42%) यांचा समावेश आहे.
  • कॅनेरा रोबेको इंफ्रास्ट्रक्चर फंड (Canara Robeco Infrastructure Fund) हा इन्फ्रा ग्रोथ फोकस्ड थीमॅटिक फंड आहे. हा फंड सप्टेंबर 2005 मध्ये बाजारात आला. ऑगस्ट 2025 पर्यंत त्याचे AUM (असेट्स अंडर मॅनेजमेंट) 8.89 अब्ज रुपये आहे. पाच वर्षात या फंडने 31.9% सीएजीआर रिटर्न दिला. या फंडची सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये 12.3 टक्क्यांची गुंतवणूक आहे. यामध्ये सर्वाधिक भारत इलेक्ट्रॉनिक्स (3.61%), डिक्सन टेक्नोलॉजीज (3.56%), सीजी पॉवर (2.99%) आणि केन्स टेक्नोलॉजी (2.14%) इतकी गुंतवणूक आहे.
  • एचएसबीसी इंफ्रास्ट्रक्चर फंड (HSBC Infrastructure Fund) हा शहर विकासावर भर देतो. हा फंड 2008 मध्ये बाजारात दाखल झाला. ऑगस्ट 2025 पर्यंत AUM (असेट्स अंडर मॅनेजमेंट) 227.8 दशलक्ष रुपये होती. सेमीकंडक्टरमध्ये या फंडचा वाटा 10.6% इतका आहे. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स 7.97%, डिक्सन टेक्नोलॉजीज 2.62% आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.