आयकरावरील गाणे तुफान व्हायरल, अर्थमंत्र्यांना दिग्गज गुंतवणूकदाराने गाण्यातून सांगितल्या भावना

nirmala sitharaman vijay kedia: विजय केडिया यांच्या या गाण्याला युजरकडून पसंती मिळत आहे. युजर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्याच्या माध्यमातून केडिया यांनी सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, बाजारातून पैसे कमवणे सोपे नाही.

आयकरावरील गाणे तुफान व्हायरल, अर्थमंत्र्यांना दिग्गज गुंतवणूकदाराने गाण्यातून सांगितल्या भावना
nirmala sitharaman vijay kediya
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 2:15 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी-03 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होत असतानाच्या दिवशी शेअर बाजारात चांगलीच घसरण झाली होती. अर्थमंत्र्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांवर कर वाढवून सर्वांना धक्का दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक कर भरावा लागणार आहे. गुंतवणूकदारांच्या भावना दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मांडल्या. त्यांचे हे गाणे चांगलेच व्हायरल झाले.

‘इतना टैक्स मैं कैसे भरूं’

दिग्‍गज गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर गाणे अपलोड केले आहेत. त्यांच्या या गाण्याचा व्हिडिओ लोकांना चांगलाच आवडला आहे. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संबोधित करत गाणे गायले आहे. गाण्याचे बोल ‘FM जी FM जी, इतना टैक्स मैं कैसे भरूं’ असे आहेत. गाण्यातून कॅपिटल गेन्सवर लावलेल्या करावर उपरोधिक टीका केली आहे. संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत आहे. बॉम्बे चित्रपटातील गाण्यावर विजय केडिया यांचे बोल आहे.

हे सुद्धा वाचा

गाण्यावर विविध प्रतिक्रिया

विजय केडिया यांच्या या गाण्याला युजरकडून पसंती मिळत आहे. युजर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्याच्या माध्यमातून केडिया यांनी सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, बाजारातून पैसे कमवणे सोपे नाही. पैसे कमवण्यासाठी जास्त जोखीम पत्करावी लागते, त्यानंतर सरकारला कर भरावा लागतो.

विजय केडिया यांचे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रतिक्रियांमध्ये अनेक यूजर्सनी त्याच्या आवाजाचे कौतुकही करत आहे. एका यूजरने त्याची तुलना ए.आर. रहमानशी केली आहे. काही युजर्सने अर्थमंत्र्यांनी गाण्यातील भावना लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट्समधील भांडवली नफ्यावर कर वाढवण्याबाबत बोलले होते. सरकारने अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा कर 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के केला होता.

'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.