
ॲप्पल कंपनीचा आयफोन 17 बाजारात दाखल झाला आहे. आयफोन खरेदीसाठी ॲप्पलच्या स्टोरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आयफोन प्रेमींमध्ये झटापट झाल्याचे पण दिसून आले. काहींनी तर ॲप्पल स्टोरसमोरच रात्रभर मुक्काम ठोकला. इतकी या स्मार्टफोनची क्रेझ आहे. काहीजण ही भारताच्या भक्कम अर्थव्यवस्थेची चुणूक असल्याचा दावा पण करत आहेत. पण काही तज्ज्ञांनी एकदम झक्कास सल्ला दिला आहे. त्यांनी आयफोन 17 (iPhone 17) खरेदी करणाऱ्यांसमोर एक गणित मांडले. बघा तुम्हाला तरी ते पटतंय का?
आयफोन 17 ची किंमत किती?
आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत जवळपास 1 लाख रुपये आहे. तर आयफोन 17 प्रो हा फोन जवळपास 1.35 लाखाच्या (256GB) घरात जातो. आयफोनची क्रेझ अधिक आहे. तो खरेदी करावा आणि मिरवावं असं अनेकांना वाटतं. दरम्यान प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ विजय केडिया यांनी आयफोन प्रेमींना सबुरीचा आणि फायदाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर iPhone 17 सारख्या महागड्या फोनवर पैसे खर्च करण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
काय मांडले फायद्याचे गणित
विजय केडिया यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, एका स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. ते म्हणाले की आयफोन 17 खरेदी करून देखावा करण्यापेक्षा इतकी मोठी रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. सहा वर्षांत एक लाखांचे दोन लाख रुपये होतील. तर इतक्या कालावधीत एक लाखांचा आता घेतलेला आयफोन 15 हजार रुपयात विक्री करावा लागेल. गुंतवणूक केल्यास जवळपास 15 पट फायदा पण होऊ शकतो, असा त्यांचे म्हणणे आहे.
If you are in queue, iPhone is not for you.
You might have other priorities in life —
mutual fund is for you. 📈
“Aa Ab Laut Chalen” https://t.co/XdP5Mc1vq7— Vijay Kedia (@VijayKedia1) September 19, 2025
आलेखातून समाजवून सांगितला फायदा
केडिया यांनी गुंतवणूकदारांना समजावून सांगण्यासाठी एक चार्ट शेअर केला आहे. त्यांनी यामध्ये एकीकडे आयफोन 17 आणि दुसरीकडे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक याचे गणित समोर आणले आहे. त्यांच्या मते म्युच्युअल फंडातील एक लाखांची गुंतवणूक सहा वर्षात 2 लाख तरी होईल. तर आयफोन 17 वर इतके रुपये खर्च केल्यानंतर सहा वर्षांनी तो विकल्यावर 15 हजार मिळाले तरी पुष्कळ समजा.