ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन आता पडेल महागात, IRDAI चं काय ठरलंय…?

ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन आता पडेल महागात, IRDAI चं काय ठरलंय...?

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर संबंधित चलनाचा आकडा विमा कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून मिळेल.

Akshay Adhav

|

Jan 19, 2021 | 10:49 AM

नवी दिल्ली : विमा नियामक आयआरडीएआयच्या कार्यसमूहाने झालेली हानी, थर्ड पार्टीचं नुकसान आणि विमा प्रीमियमचे इतर प्रकार तसेच ‘ट्रॅफिक व्हायलेशन प्रीमियम’ भरपाई करण्यासाठी ‘मोटर विमा प्रीमियम’ बनविला आहे. (IRDAI traffic Violation Premium)

नियामकाने नेमलेल्या गटाने यासाठी मोटार विम्यात पाचवा कलम समाविष्ट करण्याचे सुचविले आहे. त्याअंतर्गत ‘ट्रॅफिक व्हायोलेशन प्रीमियम’ जोडण्याची सूचना देण्यात आली आहे. हा प्रीमियम मोटारीचं झालेलं नुकसान, थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि वैयक्तिक दुर्घटना विमा प्रीमियम व्यतिरिक्त ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

भारतीय विमा नियामक तथा विकास प्राधिकरने जारी केलेल्या मसुद्यानुसार संबंधितांकडून 1 फेब्रु.2021 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रस्तावानुसार हा प्रीमियर वाहनाच्या भविष्यासंदर्भात असेल. यामध्ये दारु पिऊन गाडी चालवण्यापासून ते चुकीच्या जागी गाडी पार्क करण्यापर्यंत असे अनेक स्वरुपाच्या अपराधांबद्दल प्रीमियम असेल.

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर संबंधित चलनाचा आकडा विमा कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून मिळेल. आयआरडीएने सर्व हितचिंतकांकडून सूचना मागवल्या आहेत.

पॉइंट्सच्या आधारावर ठरणार दंड

ट्रॅफिक नियम उल्लंघनानंतर गाडीच्या नोंदणीकृत मालकाला तो दंड द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ असा की गाडीचा मूळ मालकाकडून उल्लंघनानंतर असलेला दंड वसूल केला जाईल. नव्या नियमानुसार दारु पिऊन गाडी चालवली तर 100 अंकाचा दंड द्यावा लागेल तर चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यास 10 अंकांचा दंड भरावा लागेल. प्रीमियमच्या राशीला या अंकांसोबत जोडलं जाईल.

(IRDAI traffic Violation Premium)

संबंधित बातम्या

Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक

कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें