नवी दिल्ली | 21 February 2024 : भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था लिमिटेडचा ( IREDA) शेअर सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी या सरकारी कंपनीचा आयपीओ आला होता. इरडाच्या आयपीओने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. त्यांना अवघ्या काही दिवसातच 400 टक्क्यांचा परतावा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये विक्रीचे सत्र सुरु आहे. या शेअरमध्ये सातत्याने लोअर सर्किट लागत आहे. पण या शेअरमध्ये लवकरच उसळीचे संकेत मिळत आहे. कारण इरडाने नवीन कंपनी गठीत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
काय आहे योजना
शेअरची किंमत
बुधवारी इरडाच्या शेअरच्या किंमतीत 5 टक्के घसरण दिसून आली. हा शेअर 166.35 रुपयांपर्यंत घसरला. तर 6 फेब्रुवारी रोजी हा शेअर 215 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला होता. इरडाच्या शेअरने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात प्रवेश केला होता. हा शेअर सूचीबद्ध झाला होता. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी 50 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 32 रुपये होती.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.