EPFO: नाव, जन्मतारखेतील चुकीमुळे पीएफ क्लेम अडकलाय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती

EPFO Update: अनेकदा नावातील चूक, जन्मतारखेतील बदलामुळे पीएफ क्लेम अडकतो. त्यामुळे वेळेवर पैसे मिळणे अवघड होते. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना दुरुस्तीची संधी दिली आहे. घरबसल्या कर्मचाऱ्यांना अशी दुरूस्ती करता येणार आहे.

EPFO: नाव, जन्मतारखेतील चुकीमुळे पीएफ क्लेम अडकलाय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती
नाव, जन्मतारखेतील चुकीमुळे पीएफ क्लेम अडकलाय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती
| Updated on: Nov 10, 2026 | 10:11 AM

EPFO Update: कर्मचारी भविष्य निधी(EPF) खात्यात एक चुक महागात पडते. जेव्हा पीएफ पैसा काढायचा असतो अथवा पेन्शनचा दावा करायचा असतो, ईपीएफओच्या सेवांचा लाभ घ्यायचा असतो, तेव्हा चुकीची माहितीमुळे काम अडकते. कर्मचाऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑनलाईन ज्वॉईंट डिक्लेरेशनची सुविधा दिली आहे. ईपीएफओने समाज माध्यमावरील अधिकृत एक्स (X) हँडलवरून एक पोस्ट केली आहे. त्यात पात्र सदस्य या सुविधेचा वापर करून पीएएफ खात्यात व्यक्तिगत आणि नोकरीशी संबंधित माहिती दुरूस्त करता येते. या सुविधेच्या मदतीने कर्मचारी त्यांचा रेकॉर्ड दुरूस्त करू शकतात.

काय आहे ज्वॉईंट डिक्लेरेशनची सुविधा?

Loading...

EPFO ने अधिकृत प्लॅटफॉर्मवर ज्वाईंट डिक्लेरेशन फॅसिलिटीची सविस्तर माहिती दिली आहे. या ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून पात्र सदस्य कोणत्याही मध्यस्थाशिवाय अथवा ईपीएफओ कचेरीत फेऱ्या न मांडता घरबसल्या पीएफ खात्यातील वैयक्तिक माहिती आणि नोकरीच्या तपशीलात ऑनलाईन सुधारणा करू शकतात. भविष्यात पीएफ काढताना अथवा पेन्शनचा दावा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळता येतात.

ऑलनाईन दुरुस्तीसाठी फॉलो करा या स्टेप्स

पीएफ खात्यातील माहितीत काही त्रुटी असतील, तर तुम्ही खालील 5 टप्प्यांच्या आधारे ही चूक दुरूस्त करू शकता.

१. पोर्टलवर लॉगइन कराः सर्वात अगोदर ईपीएफओच्या अधिकृत सदस्य पोर्टलवर जा. या ठिकाणी तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN), त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करा.

२. ज्वाईंट डिक्लेरेशनचा पर्याय निवडाः पोर्टलच्या डॅशबोर्डवर Joint Declaration Facility या पर्यायाची निवड करा. या ठिकाणी आवश्यक ती सुधारणा करा.

३. दुरुस्ती करायचा पर्याय निवडाः तुम्हाला कोणती माहिती दुरूस्त करायची आहे, जसे की नाव, जन्मतारीख, नोकरीचा तपशील याचा पर्याय निवडा. त्या विशिष्ट पर्यायची निवड करा आणि संबंधित माहिती दुरुस्त करा.

४. योग्य माहिती आणि कागदपत्रे जमा कराः वैयक्तिक माहिती आणि नोकरीच्या तपशीलात योग्य ती सुधारणा केल्यावर तो तपशील बिनचूक आहे का त्याची खातरजमा करा. याविषयीची कागदपत्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड स्कॅन करून अपलोड करा.

५. अंतिम सबमिट बटणावर क्लिकः आता तुम्ही जी दुरुस्ती केली आहे आणि जी माहिती अपडेट केली आहे, ती पुन्हा एकदा तपासा. आता अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा. हा अर्ज पुढील मंजूरीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवेल आणि तुमची माहिती अपडेट होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us