तुमचे आधारकार्ड 10 वर्षे जुने आहे ? UIDAI चा मोठा अलर्ट लगेच करा हे काम

तुमचे आधारकार्ड जर दहा वर्षे जुने झाले आहे तर तुम्हाला तातडीने ते अपडेट करणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन तुम्हाला आधारकार्ड केंद्रावर जावे लागणार आहे.

तुमचे आधारकार्ड 10 वर्षे जुने आहे ? UIDAI चा मोठा अलर्ट लगेच करा हे काम
aadhar card
| Updated on: Sep 30, 2025 | 6:04 PM

जर तुमच्या आधारकार्डला १० वर्षे पूर्ण झाले असतील तर तुम्हाला सावध व्हायला हवे. युनिक आयडेन्टीटी अथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने घोषणा केली आहे की १ ऑक्टोबर २०२५ पासून जुन्या आधारकार्डला अपडेट करणे गरजेचे आहे. या निर्णय देशभरातील दस्तावेजाच्या सुरक्षा, सत्यता आणि डिजिटल सेवांमध्ये सहजता येण्यासाठी घेण्यात आला आहे.

UIDAI चे CEO भुवनेश्वर कुमार यांनी सांगितले की ज्यांचे आधार कार्ड दहावर्षे जुने झाले आहे. त्यांना बायोमेट्रीक आणि डेमोग्राफीक माहिती अपडेट करावी लागणार आहे.असे जर केले नाही तर अनेक सरकारी योजना आणि खाजगी सेवा बाधित होऊ शकतील. UIDAI ची वेबसाईट वा mAadhaar एपवरुन मोबाईल क्रमांक द्वारे ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवली जाऊ शकते.

बायोमेट्रीक अपडेटसाठी आधी ५० रुपये आणि सामान्य माहिती अपडेट करण्यासाठी ३० रुपये शुल्क ठेवले होते. परंतू आता काही वर्गासाठी यातून सुट दिली आहे. UIDAI ने ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वयोगटातील मुले आणि किशोरांना दिलासा दिला आहे. आता या वयोगटातील मुलांना बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.आधी त्यांच्याकडूनही ५० रुपये घेतले जात होते. ही अपडेट आता गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यानंतर आधार अमान्य मानले जाऊ शकते.

आधारकार्डात मोठे बदल

१५ ऑगस्ट २०२५ पासून आणखी एक मोठा बदल झाला आहे.प्रोढ नागरिकांच्या ( १८ वर्षांवरील ) आधारकार्डवर आता वडील किंवा पतीचे नाव दिसणार नाही. ही माहिती केवळ UIDAI मध्ये नोंद राहिल. यामुळे नाव बदलण्याची कटकट संपणार आहे. आणि युजरची गुप्तता कायम रहाणार आहे.

UIDAI ने आधार कार्डवरील जन्म तारखेचा फॉरमॅट देखील बदलला आहे. आता कार्डावर केवल जन्मवर्ष दिसणार आहे. संपूर्ण जन्मतारीख केवळ संस्थेच्या अंतर्गत रेकॉर्डमध्ये सुरक्षित राहील. या उद्देश्य डेटाची गोपनियता आणखी मजबूत करणे हा आहे.

आता नवीन आणि अपडेटेड आधारकार्डात ‘केअर ऑफ’ म्हणजे C/O कॉलम राहणार नाही. UIDAI ने याला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे कार्डावर केवळ आवश्यक माहिती उदा. नाव, वय आणि पत्ता दिसावा अशी व्यवस्था होणार आहे.

जानेवारी २०२५ पासून पत्ता अपडेट करण्याचे नियम देखील बदलले आहेत. आता केवळ बँक स्टेटमेंट वा युटिलिटी बिल पत्ताच्या पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे. अन्य माहितीच्या अपडेट करण्यासाठी पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र वा जन्म दाखला सारख्या कागदपत्रांची आवश्यकता राहील. ऑक्टोबरपासून ही प्रक्रीया संपूर्णपणे डिजिटल होणार आहे. नागरिकांना आधी वेबसाईट वा mAadhaar ऐपवर रिक्वेस्ट नोंदवावी लागेल,त्यानंतर आधार सेवा केंद्रात जाऊन कागदपत्रे सादर करुन अपडेट पूर्ण करावे लागणार आहे.

आधारची सद्यस्थिती तपासा

या बदलांना पाहाता तुम्ही आता तुमच्या आधारकार्डच्या स्थितीची तपासणी करावी आणि जर तुमचे आधारकार्ड १० वर्षे जुने असेल तर तातडीने अपडेट करावे. ज्यांची मुले ५ ते ७ वा १५ ते १७ वर्षांची असतील त्यांना मोफत अपडेट करावे. डिजिटल प्रोसेस करण्यासाठी mAadhaar ऐप वा UIDAI वेबसाईट वापर करणे देखील आता खूप गरजेचे झाले आहे.