AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cigarette Price Hike : सिगारेट महागली, कोणता ब्रँड किती रुपयांना मिळणार? वाचा तुमच्या खिशाला किती झळ?

सिगारेटची निर्मिती करणाऱ्या ITC या कंपनीने आपल्या काही सिगारेट ब्रँडची किंमत वाढवली आहे. त्याचा फटका आता तेट सामान्यांना बसणार आहे. ITC कंपनीने Classic Connect या 20 सिगारेटच्या पॅकेटची किंमत 428 रुपये केली आहे.

Cigarette Price Hike : सिगारेट महागली, कोणता ब्रँड किती रुपयांना मिळणार? वाचा तुमच्या खिशाला किती झळ?
cigarette price increaseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 9:14 PM
Share

Cigarette Price Hike : धुम्रपान आरोग्यास खूपच हानिकारक असते. सातत्याने धुम्रपान केल्यास तुमचे फुफ्फुस थेट निकामी होऊ शकते. सिगारेट, विडीच्या पॅकेटवरही याचा स्पष्ट उल्लेख असतो. तरीदेखील रोज लाखो लोक धुम्रपान करतात. काही लोकांना तर सिगारेट किंवा विडी ओढल्याशिवाय राहवतच नाही. त्यांना लगेच अस्वस्थ व्हायला लागतं. विडी, सिगारेटची किंमत जास्त असते. तरीदेखील ते ओढणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. दरम्यान, आता धुम्रपान करणाऱ्यांच्या खिशाला आता आणखी जास्त झळ बसणार आहे. कारण सिगारेटचे काही ब्रँड महागले आहेत.

कोणत्या सिगारेटची किंमत किती वाढली?

मिळालेल्या माहितीनुसार सिगारेटची निर्मिती करणाऱ्या ITC या कंपनीने आपल्या काही सिगारेट ब्रँडची किंमत वाढवली आहे. त्याचा फटका आता तेट सामान्यांना बसणार आहे. ITC कंपनीने Classic Connect या 20 सिगारेटच्या पॅकेटची किंमत 428 रुपये केली आहे. अगोदर हे सिगारेटचे पॅकेट 390 रुपयांना मिळायचे. म्हणजेच या पॅकेटची किंमत कंपनीने 9.74 टक्क्यांनी वाढवली आहे. कंपनीने Gold Flake Super Star हे 10 सिगारेटचे पॅकेट 89 रुपयांना केले आहे. हे पॅकेट अगोदर 79 रुपयांना मिळायचे. म्हणजेच या सिगारेटच्या पॅकेटची किंमत साधारम 12.6 टक्क्यांनी वाढली आहे.

या वर्षात अनेकदा वाढवण्यात आली किंमत

आयटीसी कंपनीने आपल्या सिगारेट ब्रँड्सची किंमत यााधीही वाढवलेली आहे. 2026 या साली Classic Connect या सिगारेट ब्रँडची किंमत 300 रुपयांहून थेट 360 रुपये करण्यात आली होती. Gold Flake Super Star हा सिगारेट ब्रँड अगोदर 59 रुपयांना मिळायचा. नंतर या ब्रँडची किंमत 70 रुपये आणि नंतर 79 रुपये करण्यात आली होती. आता याच सिगारेटच्या पॅकेटची किंमत 89 रुपये झाली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने करपद्धतीत बदल केल्याने या कंपनीने आपल्या सिगारेट्स महाग केल्या आहेत, असे सांगितले जातेय. . 1 फरवरी 2026 रोजीपासून तंबाखू उत्पादनांवर 40 टक्के GST तसेच अतिरिक्त एक्साइज ड्यूटी लागू केली जाईल.  त्यामुळे या वाढीव किमतीमुळे सिगारेटप्रेमींना झळ बसणार अशी भावना व्यक्त केली जातेय.

(टीप- धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक असते. धुम्रपान करण्यास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता