
आयकर रिटर्न (ITR) भरणे आता पूर्वीसारखे किचकट राहिलेले नाही. रिटर्न दाखल करण्यासाठी आता मोबाईल ॲप्स पण दाखल झाले आहेत. त्यामुळे काही तासांचे काम अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. जर तुम्ही अद्याप आयकर रिटर्न (Income Tax Return) भरला नसेल तर आता अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली आहे. 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख (ITR Filing Last Date) आहे. आता लेट फायलिंगसाठी केवळ दंडच नाही तर दरमहा 1 टक्क्यांपर्यंतचे व्याज पण भरावे लागू शकते. करदात्यांना असा मोठा झटका बसेल. ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यांना दंडाची रक्कमही तशीच जोरदार भरावी लागेल. त्यामुळे हातातील कामं सोडून झटपट फायलिंग पूर्ण करा.
मोबाईलहून कसा करणार ITR फाईल
आयकर विभागाने यंदा मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून ITR फायलिंग सोप्पं केलं आहे. ॲनरॉईड आणि iOS वर AIS for Taxpayer आणि Income Tax Department नाव या दोन्ही अधिकृत ॲप्सच्या माध्यमातून करदात्यांना आयटीआर फाईल करता येईल. यामाध्यमातून पगारदार, सेवानिवृत्तीधारक आणि लहान करदात्यांना विना डेस्कटॉप वा कोणत्याही मध्यस्थाशिवाय रिटर्न फाईल करता येईल.
या चुका जरूर टाळा
रिटर्न फाईल करताना कोणतीही घाई गडबड करू नका. अनेकदा लोक कोणताही विचार न करतात भराभर अर्ज भरतात. त्यानंतर मग रिफंडमध्ये उशीर होऊ शकतो अथवा दंडही लागू शकतो.
जर चूक झाली तर काय कराल?
जर रिटर्न फाईलिंग करताना काही चूक झाली तर घाबरण्याची गरज नाही. आयकर अधिनियम कलम 154 अंतर्गत rectification request टाकून फॅक्चुअल एरर्स, कॅल्क्युलेशन मिस्टेक्स, मिसमॅच टॅक्स क्रेडिट सारख्या अडचणी दूर करता येऊ शकतात.