AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोने दरात मोठी घसरण; ग्राहकांची झाली चांदी

Gold Silver Rate Today 27 November 2024 : जळगावच्या सराफा बाजारातून सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता आली. सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. सलग दोन दिवसांपासून घसरण झाल्याने बाजार फुलून गेला आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोने दरात मोठी घसरण; ग्राहकांची झाली चांदी
सोने-चांदी स्वस्त
| Updated on: Nov 27, 2024 | 12:09 PM
Share

सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच आहे. २६ नोव्हेंबर रोजी सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली होती. १० ग्रॅमसाठी ७६ हजार २०० रुपये प्रति तोळे भाव झाला होता. चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८९ हजार रुपये प्रति किलोवर आली. सलग दुसर्‍या दिवशी सोने-चांदी भावात मोठी घसरण झाली. दोन दिवसांत मिळून सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातुत २,७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

सोमवारी, २५ रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर मात्र दोन आठवड्यांपासून भाव कमी-कमी होत गेले. चांदी आता ८९ हजारांवर आल्याने हे भाव गेल्या सव्वा दोन महिन्यातील सर्वात कमी भाव आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी चांदी ८८ हजार ६०० रुपये होती. त्यानंतर तिचे भाव वाढतच गेले होते.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने 7५,६९०, 23 कॅरेट ७५,३८७, २२ कॅरेट सोने ६९,३३२ रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ५६,७६८ रुपये, १४ कॅरेट सोने ४४,२७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८८,४६३ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.