मोठी बातमी! जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नफ्यावर ज्वेलर्सला द्यावे लागणार GST

| Updated on: Jul 18, 2021 | 3:14 PM

त्यानुसार जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नफ्यावर ज्वेलर्सला जीएसटी द्यावे लागणार असल्याचं सांगितलंय.

मोठी बातमी! जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नफ्यावर ज्वेलर्सला द्यावे लागणार GST
Gold Silver Price
Follow us on

नवी दिल्लीः ज्वेलर्सला जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या पुनर्विक्रीवर आता वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. अ‍ॅडव्हान्स डिसिजन अथॉरिटी (AAR) कर्नाटकने ही माहिती दिलीय. बंगळुरूची आद्या गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (Aadhya Gold Private Ltd) ने एएआरमध्ये अर्ज दाखल करत अशी माहिती मागितली होती. त्यानुसार जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नफ्यावर ज्वेलर्सला जीएसटी द्यावे लागणार असल्याचं सांगितलंय.

ज्वेलर्सवाला जुने दागिने वितळवत नाही

एखाद्या व्यक्तीकडून जुने किंवा सेकंड हँड सोन्याचे दागिने विकत घेतल्यास आणि विक्रीच्या वेळी त्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री किमतीतील फरकावर जीएसटी द्यावा लागणार आहे. एएआरच्या कर्नाटक खंडपीठाने हा निर्णय दिलाय. जीएसटी रक्कम केवळ विक्री किंमत आणि खरेदी किमतीच्या फरकावरच आधारित असेल, कारण ज्वेलर्सवाला जुने दागिने वितळवत नाही. त्यामुळे त्यातून नवीन दागिने तयार होत नाहीत. त्याऐवजी ग्राहक जुन्या दागिन्यांची साफसफाई आणि पॉलिश करीत आहे आणि त्याच्या रूपात कोणतेही बदल करीत नाही.

जीएसटी सेकंड हँड ज्वेलरीच्या पुनर्विक्रेत्यावर ही रक्कम द्यावी लागणार

या निर्णयामुळे सेकंड हँड ज्वेलरीच्या पुनर्विक्रेत्यावरील जीएसटी कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या हा उद्योग खरेदीदारास मिळालेल्या एकूण विक्री किंमतीच्या 3 टक्के इतका जीएसटी आकारतो. एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले, “बहुतेक ज्वेलर्स सामान्य लोक किंवा नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून जुने दागिने खरेदी करतात. यामुळे ज्वेलर्सच्या हातात कर जमा करण्याची गरज दूर होते.

जीएसटी केवळ खरेदी किंमत आणि विक्री किमतीच्या फरकावरच द्यावा लागणार

मोहन म्हणाले, कर्नाटक एएआरच्या व्यवस्थेनुसार जीएसटी केवळ खरेदी किंमत आणि विक्री किमतीच्या फरकावरच देण्यात येईल. याचा उद्योगावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल आणि शेवटच्या ग्राहकांसाठी कराची किंमत कमी होईल.

चिप्स पॅकेटवर 12% जीएसटी आकारला जाणार

आता चिप्स, खारट काजू आणि इतर स्नॅक्सचे पॅकेट महाग होणार आहेत. यावर आता 12% जीएसटी लागणार आहे. केरळ अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगने (एएआर) हा निर्णय घेतलाय. प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, हा जीएसटी नियम अनब्रँडेड चिप्स आणि नमकीनवरही लागू होईल.

संबंधित बातम्या

7th Pay Commission : DA वाढल्यानंतर तुमच्या PF आणि HRA वर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Pre-EMI आणि Full EMI च्या गोंधळात अनेकांना नुकसान, जाणून घ्या सर्व काही

Jewelers will have to pay GST on profits from the sale of old gold jewelery