
Reliance कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या या अगदीवर आहेत. टेलिकॉम क्षेत्रात त्यांच्या जिओने मोठी मजल मारलेली आहे. अशातच मुकेश अंबानी यांची कंपनी AC ची विक्री करत आहे. Amazon आणि Flipkart प्रमाणे मुकेश अंबानींची Jio कंपनी देखील ACची विक्री करत आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा नवीन AC घेण्याचा विचार करता असला तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन व्यतिरिक्त तुम्ही JioMart द्वारे AC खरेदी करू शकता. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी जिओ मार्टवर बंपर सूट दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या AC खरेदीवर बंपर ऑफर दिली जात आहे.
व्होल्टास कंपनीचा 64,990 किंमत असलेला हा 1.5 टन स्प्लिट एसी तुम्हाला 47 टक्क्यांच्या सवलतीनंतर 33,990 रुपये मध्ये खरेदी करता येणार आहे. या एसीची खास गोष्ट म्हणजे हा एसी 4-इन-1 कन्व्हर्टिबल फीचर, ड्युअल टेम्परेचर डिस्प्ले, 2 वे स्विंग आणि 52 डिग्रीवर कूलिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो.
ब्लूस्टार कंपनीचा 1.5 टन एसी जिओमार्टवर 41 टक्के सवलतीनंतर 43,990 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच यात 4-वे स्विंगसह येणारा हा स्मार्ट वाय-फाय एसी अलेक्सा आणि गुगल असिस्टंट सारख्या व्हॉइस असिस्टंटना सपोर्ट करणारा एसी आहे.
लॉयड कंपनीचा 47,990 किंमत असलेला हा 1.5 टन विंडो एसी जिओमार्टवर तुम्हाला 39 टक्के सूट देऊन 28,990 रुपये मध्ये खरेदी करता येणार आहे. हा एसी ४८ अंश उष्णतेमध्येही खोली थंड करण्यात सक्षम आहे. तुम्हाला AC वर 1 वर्षाची वॉरंटी आणि कंप्रेसरवर 5 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल.
ब्लूस्टार कंपनीचा हा 1.5 टन विंडो एसी ज्याची किंमत 50,000रुपये आहे. तोच एसी JioMart वर 26 टक्के सवलतीनंतर 36,700 रुपये मध्ये खरेदी करता येईल. हा इनव्हर्टर विंडो एसी 52 डिग्री उष्णतेमध्येही थंड होण्यास सक्षम आहे, याशिवाय, हा एसी टर्बो कुलिंग मोडसह येतो ज्यामुळे खोली जलद थंड होते.
Flipkart आणि Amazonवर देखील उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी विंडो आणि स्प्लिट एसी मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत, उत्पादनांवर सवलत व्यतिरिक्त, बँक कार्ड सवलतींचा फायदा घेऊन अतिरिक्त पैश्यांची बचत केली जाऊ शकते.