LIC IPO : मोठी घोषणा! 4 मेपासून करता येणार LIC आयपीओची खरेदी, किंमत 902 रुपयांपासून 949 पर्यंत

| Updated on: Apr 27, 2022 | 1:44 PM

LIC IPO Latest News : सेबी परवानगीनंतर एलआयसीच्या मंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

LIC IPO : मोठी घोषणा! 4 मेपासून करता येणार LIC आयपीओची खरेदी, किंमत 902 रुपयांपासून 949 पर्यंत
मोठी बातमी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओविषयी (LIC IPO) अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती जारी करण्यात नुकतीच जारी करण्यात आली.त्यानुसार, सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या (LIC India) या सर्वात मोठ्या आयपीओसाठी गुंतवणुकदारांना (Investors) 902 ते 949 रुपये या दरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. याला LIC 3.0 फेज असं नाव देण्यात आलं आहे. तुफिन कांत पांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरापासून एलआयसीचा आयपीओ बहुचर्चिला गेलेला आयपीओ आहे. या आयपीओची खरेदी करण्याची संधी चार मे पासून मिळणार, हे आता स्पष्ट झालं आहे. तशी अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या आयपीओसाठीचा अद्ययावत प्रस्तावाला भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळानेही म्हणजेच सेबीनंही हिरवा कंदील दाखविला होता.

सेबी परवानगीनंतर एलआयसीच्या मंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीकडे सर्वच गुंतवणुकदारांचे लक्ष लागले होतं. या बैठकीत एलआयसी आयपीओचा प्राईस बँड आणि एका खंडात किती शेअर्स असतील तसेच आरक्षण कसे ठेवायचे या सर्व महत्वाच्या मुद्यांवर दीर्घ चर्चा झाली. या चर्चेअंती मोठे आणि महत्त्वाचे निर्णय एलआयसीच्या आयपीओच्या अनुशांगानं घेण्यात आले.

एलआयसी पॉलिसी असणाऱ्यांना विशेष सवलत…

एलआयसी मंडळाने या आयपीओसाठी कर्मचा-यांना 45 रुपये तर विमाधारकांना 60 रुपये सवलत जाहीर केली. याचा अर्थ एलआयसी कर्मचा-यांना 13,560 रुपये तर विमाधारकांना 15 शेअर्सचा हा लॉट 13,335 रुपयांना मिळणार आहे. एवढी गुंतवणूक केली तरी ते एलआयसीच्या काही भागाची मालकी विकत घेऊ शकतात.

एलआयसी आयपीओत एका खंडात 15 शेअर असणार आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर 15 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. म्हणजेच, तुम्हाला 14,235 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

तर जास्तीत जास्त 14 चा लॉट आयपीओ खरेदीत विकत घेता येऊ शकेल. 14 च्या लॉटमध्ये 210 शेअर्स असणार आहेत. याची किंमत जवळपास दोन लाख रुपये इतकी होते. मोठा लॉट खरेदी करण्यासाठी 14 च्या लॉटमध्ये 210 शेअर्सप्रमाणे 1 लाख 99 हजार 290 रुपये मोजावे लागतील.