Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसी आणि रिलायन्सची कमाल; टाटांच्या या कंपनीचा महसूल काही वाढेना

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने एकाच आठवड्यात कमाल दाखवली. दोन्ही कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी आली. त्यांच्या नफ्यात वाढ दिसली. या दोन्ही कंपन्यांचे बाजारातील एकत्रित भांडवल जवळपास 77 हजार कोटींच्या घरात पोहचले आहे.

एलआयसी आणि रिलायन्सची कमाल; टाटांच्या या कंपनीचा महसूल काही वाढेना
टाटाची ही कंपनी पिछाडीवर
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 3:36 PM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकाच आठवड्यात मोठी झेप घेतली. एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक हे पण या स्पर्धेत मागे नाहीत. त्यांच्या बाजार भांडवलात चांगली वाढ दिसली. देशातील 10 मोठ्या कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ दिसून आली. या कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.48 लाख कोटी रुपयांची वाढ दिसली.

टीसीएस पिछाडीवर

तर दुसरीकडे टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसचे बाजारातील भांडवल घसरले. HUL च्या मार्केट कॅपमध्ये पण घसरण दिसली. गेल्या एका आठवड्यात मुंबई शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1.84 टक्के म्हणजे 1341.47 अंकांची वाढ दिसून आली. परिणामी देशातील टॉप 8 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसली.

हे सुद्धा वाचा

देशातील टॉप 10 कंपन्यांची बाजारातील परिस्थिती

  1. देशातील टॉप 10 मूल्य असलेल्या कंपन्यांमधील आठ कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 1,47,935.19 कोटी रुपयांनी वाढले.
  2. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे मूल्य 40,163.73 कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 6,16,212.90 कोटी रुपये झाले.
  3. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने या आठवड्यात 36,467.26 कोटी रुपये जोडले. या कंपनीचे मार्केट कॅप 19,41,110.70 कोटी रुपयांवर पोहचले.
  4. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे बाजारातील भांडवल 26,492.61 कोटी रुपयांनी वाढले. ते आता 7,64,917.29 कोटींच्या घरात पोहचले.
  5. देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेचे मूल्यांकन 21,136.71 कोटी रुपयांहून वाढून 11,14,163.29 कोटी रुपये झाले.
  6. देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक, आयसीआयसीआय बँकेचे बाजारातील भांडवल 9,570.68 कोटी रुपयांहून 7,94,404.51 कोटींच्या घरात पोहचले.
  7. देशातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक इन्फोसिसचे बाजारातील मूल्य 7,815.51 कोटींनी वाढून 5,99,376.39 कोटी रुपये झाले.
  8. तर ITC समूहाचे बाजारातील मूल्य 4,057.54 कोटी रुपयांनी वाढले. ते आता 5,44,895.67 कोटी रुपये झाले आहे.
  9. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) चे मूल्यांकन 2,231.15 कोटींनी वाढून 7,32,576.77 कोटी रुपये झाले आहे.
  10. तर देशातील मोठा उद्योग समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजच्या (TCS) बाजारातील भांडवलात 16,588.94 कोटींची घसरण झाली. हे भांडवल आता 13,92,963.69 कोटी रुपयांवर आले.
  11. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारातील मूल्य 6,978.29 कोटी रुपयांनी घसरले. ते आता 5,46,843.87 कोटी रुपयांवर आले.
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.