Share Market | शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र कायम; सेन्सेंक्स 634, निफ्टी 181 अंकांनी गडगडला

Share  Market | शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र कायम; सेन्सेंक्स 634, निफ्टी 181 अंकांनी गडगडला
शेअर बाजार

आज (गुरुवारी) सेन्सेंक्स 634.20 अंकांच्या घसरणीसह 59,464.62 आणि निफ्टी 181.40 अंकांच्या घसरणीसह 17,757.00 वर बंद झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 20, 2022 | 7:48 PM

नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारावर (Share Market) विक्रीचा दबाव कायम राहिला आहे. सेन्सेंक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) 1 टक्क्यांनी घसरण नोंदविली गेली. गेल्या तीन दिवसांत सेंन्सेक्स 1844.29 आणि निफ्टी 551.10 अंकांनी घसरला. रिलायन्स, आयटी, एफएमसीजी आणि फार्मा शेअर विक्रीमुळे मार्केटवर दबाव दिसून आला. सेन्सेंक्स वर 7 आणि निफ्टीवर 15 स्टॉक्स मजबूत झाले. त्यामुळे आज (गुरुवारी) सेन्सेंक्स 634.20 अंकांच्या घसरणीसह 59,464.62 आणि निफ्टी 181.40 अंकांच्या घसरणीसह 17,757.00 वर बंद झाला. अमेरिका ट्रेडरी बाँडच्या यील्डमध्ये वाढ, परकीय गुंतवणुकदारांचा निरुत्साह तसेच कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शेअर बाजारात अस्थिरतेचं चित्र कायम राहिलं. आज सेंन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक व्यतिरिक्त अन्य बँकिंग शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. सर्वाधिक घसरण निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा मध्ये झाली.

आजचे तेजीचे शेअर्स:

• पॉवर ग्रिड कॉर्प (4.89)
• भारती एअरटेल (1.66)
• ग्रॅसिम (1.36)
• जेएसडब्लू स्टील (1.16)
• ब्रिटानिया (0.83)

आजचे घसरणीचे शेअर्स:

• बजाज फिनसर्व्ह (-4.53)
• बजाज ऑटो(-3.73)
• डिव्हीस लॅब्स(-3.39)
• इन्फोसिस(-2.32)
• टीसीएस(-2.25)

आजचे मार्केट अपडेट:

1. निफ्टी बँक 191 अंकांच्या घसरणीसह 37,851 वर. मिडकॅप इंडेक्स 51 अंकांच्या घसरणीसह 31,312 वर.
2. बजाज फिनसर्व्ह आर्थिक तिमाहीत उत्पन्न घटले. शेअर्स गडगडले
3. घटत्या मागणीचा बजाज ऑटोवर परिणाम, 4% टक्क्यांनी घसरण
4. आयटीत तिसऱ्या दिवशी घसरण, निफ्टी आयटी 2% डाउन
5. पॉवर ग्रिड, भारती एअरटेल,ग्रॅसिम आणि जेएसडब्ल्यू स्टील निफ्टीत सर्वोत्तम कामगिरी
6. एशियन पेंट्स टॉपलाईन ग्रोथचे संकेत, 0.6% वाढ नोंद
7. पीटीसी इंडियात अंतर्गत राजीनामा सत्र, 19% टक्क्यांनी घसरण

‘सेबी’चे गुंतवणूक साथी:

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने नव्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. वैयक्तिक ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे सर्व अपडेट एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ‘साथी’ (Saa₹thi) अ‍ॅप लाँच केले आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असणारे ‘साथी’ अ‍ॅप आगामी काळात भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या :

पीपीएफ खात्यात रोज गुंतवा 250 रुपये; 25 वर्षांनंतर व्हा मालामाल, 62 लाख रुपयांचा घसघशीत परतावा

सुरक्षित गुंतवणुकीचा ‘साथी’दार: सेबीचं डिजिटल पाऊल, नवं अ‍ॅप लवकरच मराठीत!

मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें