Business Ideas : ‘ज्यांना नोकरीची सर्वात जास्त गरज आहे,अशांना नोकरी देऊ नका’ मारवाडी बिझनेसमनने सांगितलं त्या मागचं लॉजिक
Business Ideas : महिमाची पोस्ट वाचून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या Reactions देत आहेत. एका युजरने लिहिलय की, 'काम केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम'

Trending Post : ज्याला नोकरीची सर्वात जास्त गरज आहे,अशा माणसाला नोकरीवर ठेवलं तर कंपनीला फायदा होतो, असं सर्वसामान्य लॉजिक आहे. पण एका मारवाडी बिझनेस वुमनने बिलकुल या उलट म्हटलं आहे. मारवडी बिझनेस वुमन महिमा जालान यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर या मागचं कारण सांगितलं. ‘ज्यांना नोकरीची सर्वात जास्त गरज आहे, अशा माणसांना नोकरी देऊ नका’ असं त्या म्हणाल्या. “मी एका पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयलला हे बोलताना ऐकलं होतं, त्यावेळी मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजला नव्हता. पण आता, 100 पेक्षा जास्त इंटरव्यू घेतल्यानंतर मला लक्षात आलय की यामागे काय कारण आहे” असं महिमा जालान म्हणाल्या.
“काही लोक असे असतात, जे खूप हैराण असतात. कारण त्यांना बऱ्याच काळापासून नोकरी मिळालेली नसते. नोकरी मिळाल्यानंतर त्यांना असं वाटतं की, आपल्याला काहीतरी जास्त करुन दाखवण्याची गरज आहे. कारण बराच काळ आपण काही कामाचे नाही, या विचारातून ते गेलेले असतात किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात हे लोक बरेच तास काम करतात. बऱ्याच प्रकरणात हे लोक संपूर्ण टीमच्या प्रोडक्टिविटी लेवलचं नुकसान करतात” असं महिमा म्हणाल्या.
मी पण असं केलं पाहिजे का?
“शनिवारी अर्ध्या रात्री जेव्हा ते ई-मेल पाठवतात, तेव्हा टीम मधल्या दुसऱ्या सदस्यांना असं वाटतं की, मी पण असं केलं पाहिजे का?. व्यवस्थापनाला माझ्याकडून हीच अपेक्षा आहे का?. पण त्यांच्या अशा कामांमुळे सहकाऱ्यांवर आपोआपच नको ते दबाव निर्माण होतो” असं महिमा म्हणाल्या.
मूळातच ज्याची गरज नसते
“शेवटी ते लोक भरपूर थकतात. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आपल्या खराब वर्क-लाइफ बलॅन्ससाठी ते फाऊंडर किंवा कंपनीला दोषी ठरवतात. तुम्हाला असं वाटेल की , मला असं म्हणायचय की, नोकरीची गरज असणारे लोक सक्षम नाहीयत. पण माझ्या अनुभवानुसार खरंतर ते लोक अशा गोष्टींसाठी जास्त मेहनत करतात मूळातच ज्याची गरज नसते” असा महिमा यांचं मत आहे.
Don’t hire people who really need a job.
I heard Deepinder Goyal saying this on a podcast and it made zero sense to me back then. But now, after +100 interviews, I understand the why.
There are certain types of desperate people who haven’t gotten a job for a long time.
But once they get the job, they feel the urge to overcompensate because they have felt inadequate or had low self-respect for a long time.
So these people often end up working long hours to prove themselves.
And mostly they end up damaging the entire team’s productivity baseline.
When they send emails at midnight on a Saturday, other team members start wondering: “Am I supposed to be doing that? Is management expecting this?”
Even if, as a founder, you encourage them to have a work-life balance, their behaviour creates silent peer pressure.
Eventually, they burn out, their health suffers, and they blame the founder/company for their poor work-life balance.
Yes I know you expected me to say those looking for a job are inefficient, but in my experience, they always end up overcompensating for things they don’t even need to.
— Mahima Jalan ماهيما جالان (@MahimaJalan2) October 9, 2026
युजर्सची Reaction काय?
महिमाची पोस्ट वाचून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या Reactions देत आहेत. एका युजरने लिहिलय की, ‘काम केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम’ दुसऱ्या युजरने लिहिलय की,” शेवटी मोठ्या कंपन्या नोकऱ्या देणार नाहीत मग असे लोक Blinkit किंवा Zomato वर डिलीवरी बॉय किंवा डिलीवरी गर्ल बनण्याचा निर्णय घेणार” “वर्किंग आवर्स नंतरचे नियम स्पष्ट असले पाहिजेत, नाहीतर एका व्यक्तीची सवय सर्वांसाठी अपेक्षा बनू शकते” असं तिसऱ्या युजरने लिहिलय.