Max Life Insurance | मॅक्स लाईफचा सोपा पेन्शन प्लॅन; जाणून घ्या काय काय आहेत फायदे?

हा प्लान खरेदी केल्यानंतर पेन्शनच्या रुपात एक फिक्स उत्पन्न मिळते. ही योजना अर्थात पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर एक विशिष्ट रक्कम मिळते. (Max Life's Simple Pension Plan; Know what are the benefits)

Max Life Insurance | मॅक्स लाईफचा सोपा पेन्शन प्लॅन; जाणून घ्या काय काय आहेत फायदे?
| Edited By: | Updated on: May 18, 2021 | 9:03 AM

नवी दिल्ली : मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने मॅक्स लाईफ सिंपल पेन्शन प्लान (सरल पेन्शन प्लान) लॉन्च केला आहे. हा नॉन-लिंक्ड, इमीडिएट एन्युटी प्लान आहे. याचा अर्थ असा आहे की प्लॅन विकत घेतानाच एक विशिष्ट रक्कम भरावी लागेल. नंतर एका विशिष्ट अवधीवर संपूर्ण आयुष्यभर निश्चित स्वरुपाची रक्कम मिळत राहते. सरल पेन्शन प्लान सर्वसामान्य आणि सोप्या पद्धतीचा आहे. त्यामुळेच या प्लानचे नावदेखील सरळ आणि सोपे आहे. हा प्लान खरेदी केल्यानंतर पेन्शनच्या रुपात एक फिक्स उत्पन्न मिळते. ही योजना अर्थात पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर एक विशिष्ट रक्कम मिळते. अनेकांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगायचे, त्यावेळचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न सतावत असतो. अशा लोकांचा विचार करून मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने या प्लानची आखणी केली आहे. हा प्लान खरेदी करणारी व्यक्ती एका गॅरेंटेड रक्कमेची व्यवस्था करते. (Max Life’s Simple Pension Plan; Know what are the benefits)

पेन्शन प्लानचे दोन प्रकार

मॅक्स लाईफने या योजनेविषयी सांगितले की, समाजातील बहुतेक लोकांना भविष्यातील आर्थिक सुरक्षेची चिंता सतावत असते, लोकांना भविष्यातील आपल्या आर्थिक तरतुदीबाबत हमी हवी असते. याचाच विचार करून कंपनीने सरल पेन्शन प्लान दोन प्रकारामध्ये लॉन्च केला आहे. एका प्रकारात कोणतीही एकटी व्यक्ती (सिंगल पर्सन) हा प्लान खरेदी करू शकते आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवू शकते. दुसऱ्या प्रकार दोन व्यक्तींसाठीचा आहे. या दोन व्यक्ती एकसाथ हा प्लान खरेदी करू शकतील. याचा दोघांनाही फायदा होऊन सेवानिवृत्तीनंतर दोघेही पेन्शन मिळवू शकतील. मृत्यूनंतर रिटर्नचे पैसे अर्थात विम्याची रक्कम वारस म्हणून नेमलेल्या व्यक्तीला मिळते.

त्वरित पेन्शनचा प्लान

सरल पेन्शन प्लान एक इमिडिएट एन्युटी प्लान आहे. अर्थात ही तत्काळ फायदा लागू करणारी योजना आहे. विमाधारकाला पॉलिसी घेतल्यानंतर लगेचच पेन्शन सुरू होते. इमीडिएट एन्युटीला तुम्ही इमीडिएट पेंशनदेखील म्हणू शकता. तुम्हाला पेन्शन प्रत्येक महिन्याला हवीय की तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षाला हे तुम्हाला ठरवावे लागेल. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन हवी असेल तर तुम्ही मासिक पेन्शनचा पर्याय निवडायला हवा. तशाच प्रकारे तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शनची निवड करू शकता. जर तुम्ही मासिक पेन्शनचा पर्याय निवडाल, तर एक महिन्यानंतर, तिमाहीच्या पर्यायात तीन महिन्यानंतर, सहामाहीत सहा महिन्यानंतर आणि वार्षिकच्या पर्यायामध्ये एक वर्षानंतर पेन्शन सुरू होऊ शकते.

ही पॉलिसी कोण घेऊ शकते?

या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 40 वर्षे असायला पाहिजे. म्हणजेच 40 वर्षांची कोणतीही व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. तसेच जास्तीत जास्त वय 80 वर्षे असायला पाहिजे. थोडक्यात काय तर वय 40 ते 80 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. मिनिमम पेन्शनच्या आधाराने मिनिमम इन्व्हेस्टमेंटची रक्कम निश्चित होईल.

कशी मिळेल पेन्शन

मॅक्स लाईफच्या पेंशन प्लानमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सिंगल लाईफ आणि दुसरा प्रकार म्हणजे जॉईंट लाईफ इन्युटी. सिंगल लाईफ एन्युटीचा अर्थ असा होतो की, पॉलिसी घेतल्यानंतर लगेचच निश्चित उत्पन्नाला सुरुवात होते. विमाधारकाला संपूर्ण आयुष्यभर हे उत्पन्न मिळते. विमाधारक जीवंत असेपर्यंत त्याला हे उत्पन्न मिळत राहते. दुसऱ्या प्रकारात म्हणजेच जॉईंट लाईफ पॉलिसीमध्ये पेन्शन पती-पत्नी अशा दोघांशी संबंधित असते. या योजनेत पती किंवा पत्नी जो तुलनेत अधिक काळ जिवंत राहील, त्याला त्याच्या आयुष्यभरापर्यंत पेन्शन मिळत राहते. जेवढी पेन्शन एका व्यक्तीला जिवंत राहून मिळेल, तेवढीच पेन्शन त्याच्या पश्चात जीवन साथीदारालाही मिळेल.

कधी करू शकता पॉलिसी सरेंडर?

या योजनेत विमाधारकाला पॉलिसी सरेंडर करण्याचीही सुविधा आहे. विमाधारकाला हवे असेल तर पॉलिसीच्या मध्यावरही पॉलिसी सरेंडर करू शकतो. जर विमाधारकाची तब्येत गंभीररित्या बिघडली किंवा प्लान खरेदी करणाऱ्या व्यक्तीची पत्नी वा मुले गंभीर आजारी पडली तर विमाधारक पॉलिसी सरेंडर करून प्लानच्या 95 टक्के रक्कम काढू शकतो. (Max Life’s Simple Pension Plan; Know what are the benefits)

इतर बातम्या

मासेमारीसाठी कोयना नदीत जाळं टाकलं, माशांच्या गळाला बॉम्ब, तरूण भयभीत

व्हॉट्स अ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारने न्यायालयात दिली ही माहिती