AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासेमारीसाठी कोयना नदीत जाळं टाकलं, माशांच्या गळाला बॉम्ब, तरूण भयभीत

कराड तालुत्यातील तांबये येथील कोयना नदी पात्रात तीन जिवंत हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब सापडले आहेत (hand grenade bomb found in Koyna river at Karad)

मासेमारीसाठी कोयना नदीत जाळं टाकलं, माशांच्या गळाला बॉम्ब, तरूण भयभीत
कोयना धरणात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात जिवंत हॅन्ड ग्रॅनाईट, मच्छीमार तरुण भयभीत
| Updated on: May 17, 2021 | 11:17 PM
Share

कराड (सातारा) : कराड तालुत्यातील तांबये येथील कोयना नदी पात्रात तीन जिवंत हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब सापडले आहेत. काही तरुण मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. यावेळी त्यांनी मासे पकडण्यासाठी गळ (जाळं) पाण्यात टाकलं. पण त्या गळमध्ये मासा न अडकता थेट बॉम्ब अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब जिवंत आहेत का, याबाबत मासेमारी करणाऱ्या तरुणांना माहिती नव्हती. पण बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली (hand grenade bomb found in Koyna river at Karad).

गळमध्ये बॉम्ब नेमके कसे अडकले?

संबंधित घटना ही सोमवारी (17 मे) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास समोर आली. कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक काही तरुण मासेमारीसाठी नदीपात्रात गेले. त्यांनी मासे पकडण्यासाठी गळ पाण्यात टाकलं. हे गळ नदीत खाली वाहत जाते. त्यामध्ये माशांना आकर्षित करण्यासाठी काही खाद्य पदार्थ टाकण्यात आलेलं असतं. त्यातून त्या गळमध्ये मासा अडकतो. मात्र, बऱ्याचदा नदीत बूट किंवा नदीतील इतर कचराही गळमध्ये अडकतो. त्यामुळे मासेमारी करताना सतत याबाबत काळजी घ्यावी लागते (hand grenade bomb found in Koyna river at Karad).

कोयना नदीत गळ टाकल्यानंतर तरुण माशांची वाट बघत बसले होते. यावेळी नदीत एक पिशवी गळमध्ये फसली. तरुणांना वाटलं कचरा असेल. त्यांनी संबंधित पिशवी बाहेर काढली. मात्र, ती पिशवी बाहेर काढल्यानंतर त्या पिशवीत नेमकं काय असेल या उत्सुकतेपोटी त्यांनी ती पिशवी उघडली. पण त्यांनी पिशवी उघडल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या पिशवीत तीन हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब होते.

पोलीस घटनास्थळी दाखल

पोलिसांना संबंधित घटनेबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधिक्षक (एसपी) अजयकुमार बन्संल यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणावर सविस्तर तपास झाल्यानंतर स्पष्टपणे प्रतिक्रिया देऊ, असं सांगितलं आहे.

संबंधित बॉम्ब जास्त धोकादायक

दरम्यान, कोयना नदीत सापडलेले हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब प्रथमदर्शनी लष्करातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. “कोयना नदीत सापडलेले बॉम्ब सरकारी सुरक्षा यंत्रणेला दारूगोळा पुरवठा करणाऱ्या आँडनन्स फँक्टरीत बनवलेले असून ते अत्यंत धोकादायक आहेत. ते इकडे कसे आले याचा तपास करुन दोन तीन दिवसात चित्र स्पष्ट करु”, अशी प्रतिक्रिया सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्संल यांनी दिली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण सापडले, मृतांची संख्याही घटली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.