Mutual Fund SIP | बँक खात्यात रक्कम नसल्याने SIP हुकली, तुमच्या गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?

| Updated on: Aug 31, 2022 | 9:00 PM

Mutual Fund SIP | बँक खात्यात रक्कम नसल्याने SIP चा हप्ता थांबला. मग आता काय होऊ शकते. तुम्हाला दंड लागेल की योजना थांबेल, काय होईल ते समजून घेऊयात.

Mutual Fund SIP | बँक खात्यात रक्कम नसल्याने SIP हुकली, तुमच्या गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?
SIP हुकली,काय होईल?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Mutual Fund SIP | पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची मानण्यात येते. बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. त्यात रिस्क नाही. पण परतावा म्युच्युअल फंड (Mutual Fund) इतका मोठा मिळत नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानुसार बँका व्याजदर निश्चित करतात. त्याआधारे परतावा मिळतो. पण म्युच्युअल फंड हा बाजारावर आधारीत असतो. धोका असला तरी फायदा ही भरपूर मिळतो. त्यातच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP)गुंतवणूक केल्यास परतावा चक्रव्याढ व्याजाच्या आधारे मिळत असल्याने तो कैकपटीने वाढतो आणि गुंतवणूकदाराला मोठा फायदा होतो. तसेच एकदाच मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. दर महिन्याला ठराविक रक्कम हप्त्याच्या रुपात बँक खात्यातून (Bank Account) कपात होते. पण जर एखाद्यावेळी तुमच्या खात्यातून रक्कम वळती झालीच नाही. अथवा खात्यात शिल्लकी नसल्याने एसआयपी पूर्ण झाली नाही तर काय होते? त्याचे तोटे काय आहेत याची उजळणी करुयात.

पहिली चूक पदरात

समजा खात्यात रक्कम शिल्लक नसेल अथवा काही कारणाने एसआयपी पूर्ण झाली नाहीतर काळजीचे कारण नाही. एखाद्या महिन्यात ही चूक ग्राह्य धरण्यात येते. त्यासाठी फंड हाऊस तुम्हाला कसले ही शुल्क आकारत नाही वा दंड ही लावत नाही. परंतु, वारंवार असे घडल्यास, सलग तीन वेळा एसआयपी चुकवल्यास तुमचे या फंडातील योगदान थांबवण्यात येते. म्हणजे तुमच्या खात्यातून म्युच्युअल फंडात रक्कम जमा होत नाही.

पण बँकेचा नियम काय सांगतो

फंड हाऊस एखादी चूक माफ करते. सलग चुकीला माफी न देता, तुमचे कनेक्शनचं बंद करते. त्यामुळे त्या फंडात तुमच्या खात्यातून रक्कम अदा होत नाही. आता युपीआय पेमेंटमुळे तुम्हाला बाहेरून रक्कम जमा करता येते. पण बँकेचं काय? बँक तुम्हाला माफ करते की दंड आकारते. तर बँक व्यवहार पूर्ण न केल्याने दंड आकारते. हा दंड प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो. एसआयपी पूर्वी तुम्ही खात्यात रक्कम ठेवली नसेल आणि हप्ता चुकला असेल तर बँक तुमच्याकडून दंड आकरते. विशेष म्हणजे म्युच्युअल फंड हाऊस एसआयपीपूर्वी खात्यात रक्कम ठेवण्याविषयीचा अलर्ट मॅसेज पाठवते.

हे सुद्धा वाचा

कडकी असल्यास कळवा फंड हाऊसला

महागाईच्या या काळात नियोजन करणे आणि घर चालवणे सोपे राहिले नाही. त्यामुळे अचानक खर्च वाढल्यास गफलत होते आणि खात्यात छदामही राहत नाही. अशावेळी बँकेची पेनल्टी टाळण्यासाठी, एसआयपीचे नियोजन करण्यासाठी तुम्ही फंड हाऊसला एसआयपी काही काळ थांबवण्याचे कळवू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला एक महिन्याअगोदरच फंड हाऊसला आगाऊ सूचना द्यावी लागते.