Gold Bond : सोन्याचा दर 54000 रुपयांच्या घरात, स्वस्तात करा केंद्र सरकारडून सुवर्ण खरेदी, अशी संधी पुन्हा नाही

| Updated on: Dec 16, 2022 | 5:39 PM

Gold Bond : सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येईल..

Gold Bond : सोन्याचा दर 54000 रुपयांच्या घरात, स्वस्तात करा केंद्र सरकारडून सुवर्ण खरेदी, अशी संधी पुन्हा नाही
गोल्ड बाँडमध्ये करा गुंतवणूक
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतात सोन्यातील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित आणि फायद्याची मानण्यात येते. चीननंतर भारतीय लोक सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक करतात. सोन्यात गुंतवणुकीसाठी भारत सरकारनेही खास ऑफर आणली आहे. केंद्र सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा तिसरा टप्पा आहे. आयएनआरच्या (INR) माहितीप्रमाणे आतापर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना दर वर्षाकाठी सुमारे 8 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. परिणामी सोन्यातील गुंतवणुकीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते.

लग्नसराईमध्ये सोन्याचा भाव 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येते. एक ग्रॅमपासून ग्राहकाला सोने खरेदी करता येते. या बाँडमध्ये रोखीत, डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंगच्या मार्फत खरेदी करता येईल.

आरबीआय दोन टप्प्यात सरकारी गोल्ड बाँड स्कीम जारी करणार आहे. या योजनेत डिसेंबर आणि मार्चमध्ये उघडण्यात येईल. अर्थ मंत्रालयानुसार, सरकारी गोल्ड बाँडमध्ये 2022-23, तिसऱ्या टप्प्यात 19 ते 23 डिसेंबर दरम्यान गुंतवणूक करता येईल.

हे सुद्धा वाचा

27 डिसेंबर रोजी पात्र अर्जदारांना बाँड जारी करण्यात येईल. गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 999 शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित होते. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून रक्कम अदा करणाऱ्यांना 50 रुपयांची सवलत मिळेल. तर या योजनेचा 6 ते 10 मार्च दरम्यान चौथा टप्पा असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली आहे. सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना सुरु केली. गोल्ड बॉण्ड्स सरकारच्यावतीने RBI जारी करते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे आले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीवर आधारित असते.

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाते.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.

या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास ते 5 व्या वर्षानंतर या योजनेतून बाहेर पडू शकतात.