Government : सरकारचा हा उद्योग एकमद बेस्टम बेस्ट बघा, नुसता तिजोरी भरतोया..

| Updated on: Oct 01, 2022 | 4:19 PM

Government : सरकारचा हा उद्योग सर्वात जोमाने सुरु आहे. त्यात सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी येत आहे..पण हा उद्योग नेमका आहे तरी कोणता ?

Government : सरकारचा हा उद्योग एकमद बेस्टम बेस्ट बघा, नुसता तिजोरी भरतोया..
सरकारची बक्कळ कमाई
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : कोविड (Covid-19) महामारीत सरकारच्या तिजोरीवर (Government Treasury) खर्चाचा भार पडला होता. पण मिळकत कमी झाली होती. सरकारची कमाई मोठ्या प्रमाणात घटली होती. आता मात्र गेल्या 7 महिन्यांपासून सरकारच्या तिजोरीत गंगाजळी येऊन पडत आहे. कमाईने (Income) सगळे विक्रम मोडीत काढले आहेत.

वस्तू आणि सेवा कराने (GST )सरकारच्या तिजोरी ओसंडून वाहत आहे. सलग 7 व्या महिन्यात रेकॉर्डब्रेक GST जमा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात 1.5 लाख कोटी रुपयांची आवक तिजोरीत झाली आहे.सप्टेंबर महिन्यात 26 टक्क्यांनी जास्त कमाई झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.47 लाख झाले आहे. तसेच या महिन्यात ई-बिल्स आणि ई-इनवाईसची संख्या 1.1 कोटी झाली आहे. एप्रिल महिन्यात एकूण 1.67 लाख कोटींचा जीएसटी जमा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थ मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून तिजोरीत 1,47,686 कोटी रुपये आले. जीएसटी लागू झाल्यापासून या वर्षात सरकार मालामाल झाले आहे. सलग 8 व्या महिन्यात रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळाले आहे.

सप्टेंबरमध्ये सलग 8 व्या महिन्यात जीएसटी उत्पन्न 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आले आहे. या आवकमध्ये C-GST चा वाटा 25271 कोटी रुपये आहे तर SGST 31813 कोटी रुपये, IGST चा वाटा 80464 कोटी आणि सेसचा हिस्सा 10137 कोटी रुपये आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जीएसटीचा जेवढा वाटा होता, त्यापेक्षा या सप्टेंबर महिन्यात 26 टक्क्यांनी सरकारची कमाई वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी सरकारने 49453 कोटी रुपयांची कमाई केली.

जीएसटी जमा करण्यात बिहारने गेल्यावर्षीपेक्षा या महिन्यात 67 टक्क्यांची वाढ नोंदवली. नागालँड या राज्याने 61 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. जीएसटी कलेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे महाराष्ट्र सर्वात अग्रेसर ठरला आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातून 21403 कोटी रुपये जमा करण्यात आले.