
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 2022 सालीच आपल्या तिन्ही मुलांमध्ये व्यवसायाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच वाटप केलं होतं. मुलगी ईशा अंबानीला रिटेल, मोठा मुलगा आकाशाला टेलिकॉम आणि लहान मुलगा अनंत अंबानीला एनर्जी सेक्टरची जबाबदारी सोपवली होती. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी लहान मुलावर खुश होऊन त्याच्यावर नवीन जबाबदारी सोपवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने एक मोठ पाऊल उचललय. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात अनंत एम. अंबानी यांना 1 मे 2025 पासून पुढील पाचवर्षांसाठी कंपनीत एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून नियुक्तीस मंजुरी दिली आहे. आतापर्यंत अनंत अंबानी हे नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून कंपनीमध्ये कार्यरत होते.
अनंत अंबानी मार्च 2020 पासून जियो प्लेटफॉर्म लिमिटेडच्या बोर्डावर आहेत. मे 2022 पासून त्यांनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या बोर्डात योगदान द्यायला सुरुवात केली. त्याशिवाय जून 2021 पासून ते रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडच्या बोर्डावर आहेत. सप्टेंबर 2022 पासून ते रिलायन्स फाऊंडेशनच्या बोर्डामध्ये आहेत. समूहाची ती सामाजिक सेवा करणारी शाखा आहे. ब्राउन यूनिवर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालेल्या अनंत यांना कंपनीच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रात नेतृत्वाचा अनुभव आहे.
उत्तराधिकार योजनेचा भाग
हा निर्णय अंबानी कुटुंबाच्या उत्तराधिकार योजनेचा भाग आहे. ज्यातंर्गत पुढच्या पिढीला रणनीतिक जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी अनंतची नेतृत्व क्षमता आणि ऊर्जा क्षेत्रातील त्याची समज याचं कौतुक केलं होतं.
इक्विटी ₹10 लाख कोटीपेक्षा अधिक
RIL ने जानेवारी-मार्च 2025 च्या तिमाहीचे रिझल्ट जाहीर करुन नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. रिलायन्स भारताची पहली कंपनी बनली आहे, जिची एकूण इक्विटी ₹10 लाख कोटीपेक्षा अधिक झाली आहे.
तिमाहीत रेकॉर्ड महसूल आणि नफा
कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, रिलायन्सच्या डिजिटल सेवेने तिमाहीत रेकॉर्ड महसूल आणि नफा कमावला आहे. चांगली यूजर एंगेजमेंट आणि मजबूत सब्सक्राइबर मिक्समुळे कमाईत वाढ झाली आहे.