AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर, अंबानी पहिल्या क्रमांकावर, टॉप 10 मध्ये कुणाचा समावेश?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $116 अब्ज (सुमारे ₹9.5 लाख कोटी) आहे.

भारतातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर, अंबानी पहिल्या क्रमांकावर, टॉप 10 मध्ये कुणाचा समावेश?
mukesh ambani
| Updated on: Jul 06, 2025 | 10:15 PM
Share

फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. मात्र भारतातील लोकांचे लक्ष देशातील श्रीमंतांच्या यादीवर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $116 अब्ज (सुमारे ₹9.5 लाख कोटी) आहे, यामुळे ते केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीनंतर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अदाणींची संपत्ती सुमारे $84 अब्ज आहेत. अदानी गृप ऊर्जा, बंदर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत आहे. गेल्या काही वर्षांत वाद आणि शेअर बाजारातील चढउतारांमुळे अदानींना फटका बसला असला तरी ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर आहेत, त्यांची संपत्ती सुमारे $36.9 अब्ज आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांची संपत्ती $33.5 अब्ज आहे.

टॉप 10 मध्ये या नावांचा समावेश

भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत दिलीप शांगवी (सन फार्मा), सायरस पूनावाला (सेरम इन्स्टिट्यूट), कुशल पाल सिंग (डीएलएफ), कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप), राधाकिशन दमानी (डीमार्ट) आणि दहाव्या स्थानावर लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल) आहेत.

भारतातील हे सर्व व्यावसायिक केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही मोठी भूमिका बजावत आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान, औषध आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. याचा फायदा आगामी काळात देशाला नक्कीच होणार आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.